शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धान्य दुकानात लागणार ‘पॉर्इंट आॅफ सेल’ उपकरण

By admin | Updated: May 8, 2016 00:27 IST

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्णत: संगणकीकरण करण्यात येत असून त्याअंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून...

भंडारा : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्णत: संगणकीकरण करण्यात येत असून त्याअंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्यासाठी ‘पॉर्इंट आॅफ सेल’ हे उपकरण लागणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी तिचे संपूर्ण संगणकीकरण करण्यासाठी यापूर्वीच मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत दोन टप्प्यात कार्यवाही करण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून राज्य शासनाच्या गोदामापर्यंत सर्व टप्प्याचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व रास्त भाव दुकानातील व्यवहाराचे संगणकीकृत व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या १०३ कोटी ९९ लाख रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात रास्त भाव दुकानात लाभार्थ्यांची आधार क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यासाठी मोबाईल टर्मिनल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करणाऱ्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मोबाईल टर्मिनल तंत्रज्ञानाऐवजी पाँइट आॅफ सेल हे उपकरण अधिक योग्य असल्याने त्याच्या वापराची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यातील ५१ हजार ७२५ रास्तभाव दुकानांमध्ये हे उपकरण बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासन प्रति क्विंटल ८.५० रूपये याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देणार आहे. त्यातून या प्रकल्पाचा खर्च भागविण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)