शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

रात्रीच सोडल्या गेली पोकलँड मशीन

By admin | Updated: May 1, 2015 00:53 IST

अवैध रेतीची वाहतुक करणारे ट्रॅक्टर सोडले नाही म्हणून तासभर करडी चौकीत...

करडी (पालोरा) : अवैध रेतीची वाहतुक करणारे ट्रॅक्टर सोडले नाही म्हणून तासभर करडी चौकीत ठिय्या मांडून बसलेल्या आ. चरण वाघमारे यांच्या निर्देशानुसार तहसिलदार मोहाडी व पोलिसांनी कान्हळगाव घाटातून पोकलँड मशीन मोठ्या तावात येवून ताब्यात घेतली. त्यावेळी घाटात उपसा करण्यासाठी पोकलँड मशीनची परवानगी आहे किंवा नाही याची सहनिशा न करता ४ ते ५ कि़मी. अंतरावरील करडी पोलीस चौकीत ती जमाही केली. करडी पोलिसांनी मुंढरी रेतीघाटावरून अवैधपणे उपसा करून चोरटी वाहतूक करणारे खडकी व मुंढरी येथील दोन ट्रॅक्टर करडी पोलीस चौकीत ताब्यात घेवून जमा केले. कारवाई सुद्धा केली. भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने ट्रॅक्टर सोडण्यासाठी दबाव निर्माण केला असताना ती सोडण्यात आली नव्हती. दोन्ही ट्रॅक्टर भाजपा कार्यकर्त्यांचे होते व ती सांगितल्यानंतरही सोडण्यात न आल्याने आमदार चरण वाघमारे यांनी सर्व कामे बाजुला सारीत मोहगाव वरून करडी पोलीस चौकीत धाव घेतली. तासभर ठिय्या मांडून पोलीस व महसूल प्रशासनावर तासेरे ओढले. भुरट्या रेती चोरट्यांना तुम्ही पकडता, मग मोठ्यांना का पकडत नाहीत. त्याचेशी काही साटेलोटे तर नाही, असा प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले. अवैधपणे जेसीबी व पोकलँड मशीनने रेतीचा उपसा करणाऱ्या घाटांवर कारवाई झाली पाहिजे, असे निर्देश दिले. व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.आमदार महोदयांच्या निर्देशानुसार मोहाडी तहसिलदार करडी चौकात धाडकन पोहचले. पोलिसांना घेवून कान्हळगाव रेतीघाटावर गेले. मोहाडी पोलिसांची चमू सुद्धा मदतीला बोलविण्यात आली. त्यावेळी तहसिलदार थोटे यांनी पोकलँड किंवा जेसीबीने रेतीचा उपसा करण्याची परवानगी नसल्याची माहिती माध्यमांनाच्या प्रतिनिधींना सुद्धा दिली. कान्हळगाव घाटावरील ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला असताना मशीन रस्त्यावरून नेऊन चौकीत जमा करण्यात आली. प्रशासन घाटावरच परवानगी आहे किंवा नाही ते तपासून पाहू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. दबावात कारवाई केली.रात्री ८ ते ८.३० वाजताचे दरम्यान घाट ठेकेदारांनी पोकलँडने रेतीचा उपसा करण्याची परवानगी असलेले पत्र दाखविल्याचे कारण देत मशीन तहसिलदारांनी सोडली. (वार्ताहर)