शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

पंतप्रधान सडक योजना कागदोपत्री

By admin | Updated: April 5, 2015 00:53 IST

मागील सहा महिन्यांपासून आमगाव ते मुंडीपार पुढे बंजारीटोला गावापर्यंत १२ किमी रस्ता दुरुस्ती करणाचे काम सुरू आहे.

निधीचा अभाव : शंभुटोला मार्गावर खोदकामामुळे प्रवाशांना यातनाआमगाव : मागील सहा महिन्यांपासून आमगाव ते मुंडीपार पुढे बंजारीटोला गावापर्यंत १२ किमी रस्ता दुरुस्ती करणाचे काम सुरू आहे. माल्ही गावाजवळून शंभुटोला गावापर्यंत पूर्ण डांबरीकरणासाठी खोदकाम झाले. रस्त्यावर गिट्टी पडली आहे. ठिकठिकाणी पाईप टाकून बांधकाम सुरू आहे. मात्र या अर्धवट कामामुळे अनेक प्रवाशांना यातना सहन कराव्या लागत आहेत. त्याची जाणीव अधिकारी व कंत्राटदारांना नाही. निधीअभावी पंतप्रधान सडक योजना केवळ कागदावरच आहे. अधिकारी तोंडावर हात ठेवून बसले आहेत.हा रस्ता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र एवढा निधी मार्गाला उपलब्ध होऊ शकत नाही. काम लवकरात लवकर झाले पाहिजे याकरिता सदर १२ किमीचा रस्ता पंतप्रधान सडक योजनेत समाविष्ट करण्यात आला. या मार्गाच्या कामाकरिता नगरातील कामठा चौकात सर्वदलीय आंदोलन झाले. मार्गाकरिता निधीचा पहिला टप्पा आला. कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. तब्बल चार किमीचे डांबरीकरण काढून फेकले. पाच वर्षांपूर्वीचे डांबरीकरण निघाले, परंतु मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या गिट्टीमुळे सायकल, आॅटोरिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे त्रासदायक ठरत आहे.ठिकठिकाणी मार्गावर लहान पुलाचे पाईप टाकून काम सुरू असले तरी कामाची गती संथ आहे. रात्री प्रवास करताना प्रवाशांना किंवा दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून वाहन काढावे लागत आहे. काम सुरू असलेल्या पुलावरची माती जडवाहनाने खचली तर वाहन खोदकाम झालेल्या खड्ड्यात जावून मोठी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही. जुने पाईप टाकलेल्या ठिकाणी मोठे खड्डे पाईपात पडले आहेत. अनोळखी प्रवासी या मार्गावरुन गाडी घेऊन निघाला तर गाडी घेऊन खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. हे खड्डे तब्बल पाच वर्षांपासून आहेत. मात्र अधिकारी खड्डा बघत मौन बाळगून आहेत. एकंदरित या मार्गावरुन प्रवास करणे तेवढे सोपे नाही. जीव धोक्यात टाकून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. मार्गावरील पडलेले मोठमोठे खड्डे चुकविता येऊ शकत नाही. चुकविण्याचा प्रयत्न केला तर दुसरा खड्डा दत्तक म्हणून उभा असतो. खोदकामामुळे रस्त्यावर पडलेली गिट्टी, संथ गतीने सुरू असलेले नाली बांधकाम यामुळे प्रवाशांचे या मार्गावर प्रवास करतेवेळी जीव गुदमरुन गेल्याशिवाय राहत नाही. शाळकरी मुले, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी याची ये-जा मोठ्या प्रमाणात या मार्गावर आहे. त्रास होतो म्हणून अनेक प्रवाशी माल्ही गावातून शंभुटोला या मार्गावरुन फेरा मारुन प्रवास करीत आहेत. निधीचा दुसरा हप्ता उपलब्ध झाला नाही. कंत्राटदाराने निधी नसल्याचे सांगून काम कासवगतीने सुरू केले आहे. आता दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १२ किमीच्या रस्त्याचे डांबरीकरण करून प्रवाशांच्या यातना कमी करण्याचे प्रयत्न होतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी) अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्थाआमगाव, शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरी, मुंडीपार, खैरीटोला पुढे बंजारीटोला असा १२ किलोमीटर अंतराचा रस्ता जवळपास आठ गावांना जोडणारा आहे. याच मार्गावरुन ननसरीवरुन बाघनदीच्या पात्रातून मध्य प्रदेशातील परसोडी, देऊळगाव व इतर गावातील नागरिक याच मार्गाने प्रवास करतात. उन्हाळ्यात बाघनदीच्या पात्रात पाणी राहत नाही. पात्र कोरडे असल्याने कमी वेळात प्रवास करणारे प्रवाशी येथून जाणे-येणे करतात. दुर्दैव म्हणजे या रस्त्याचे तब्बल पाच वर्षांपासून डांबरीकरण झाले नाही. जे डांबरीकरण झाले त्यात तीन ते चार फूट लांब खड्डे पडले. अनेक खड्ड्यांनी सदर रस्ता अपघाताचा मार्ग ठरला आहे.