शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या लाटेत भरघोस मदत; दुसऱ्या लाटेत मदत करणारेच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:32 IST

गोंदिया : मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही म्हणून केंद्र सरकारपासून तर गावातील ...

गोंदिया : मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही म्हणून केंद्र सरकारपासून तर गावातील ग्रामपंचायतीनेदेखील फूल नव्हे, तर फुलाची पाकळी म्हणून मदत केली. सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व समाजातील धनाढ्य व्यक्तींनी गोरगरिबांना, गरजूंना, विधवा, परित्यक्ता यांना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, गव्हाचे पीठ, सोयाबीन वळी, चणाडाळ, तूरडाळ, हरभरा अशा विविध वस्तू गोरगरिबांना वाटप केल्या. जणू हे वाटप करण्याची पैजच लागली असावी असे चित्र होते.

मागच्या वर्षी लाॅकडाऊन सुरू झाले तेव्हा गोरगरिबांनी पैसे कमविले तेव्हा त्यांच्याजवळ पैसेही होते तरीही त्यांना मदत करण्यात आली होती; परंतु यंदा कोरोनामुळे कुणाकडे पैसे नसताना गोरगरिबांना या कोरोनाचा संकटाचा सामना करताना पोटाचा प्रश्न आड येत आहे. अशात महाराष्ट्र सरकारने तुटपुंजी मदत करण्याची घोषणा केली; परंतु ही मदत तोकड्या लोकांनाच मिळणार आहे. उर्वरित गोरगरिबांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता दोन वेळच्या जेवनाची समस्या भेडसावत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे पोटाचा प्रश्न भेडसावत आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करून फोटो प्रकाशित करणाऱ्यांनी यंदा का मदतीसाठी हात पुढे केला नाही. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आताही त्यांच्याकडून संपले नसावेत असा तर धान्य देणारे विचार करत नाही ना, असा सवाल उपिस्थत होत आहे.

मदतीला फॅड बनवू नका

एखाद्या नेत्याने आवाहन जर केले तरच आपण गोरगरिबांना मदत करू, असा गोड गैरसमज समाजात निर्माण झालेला दिसतो. मागच्या वर्षी देशातील बड्या नेत्यांच्या आवाहनावरून उद्योजकांपासून तर गावखेड्यांतील लोकांनी आपापल्यापरीने मदत केली; परंतु यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. मागच्या वर्षी फक्त माध्यमांमध्ये आपला फोटो छापून येईल म्हणून मदत वाटप केली की काय? मदत करण्याचा एक फॅड त्यावेळी तयार झाला होता. मग आता गोरगरिबांना मदत कोण करणार, दानदाते आपला मदतीचा हात पुढे करतील का, असा सवाल होत आहे. कोरोनामुळे गोरगरिबांना दोनवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे.