शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंनो हा देश तुमच्या सोबत उभा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

साकोली : स्थानीय वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात राजीव गांधी महाविद्यालय सडक-अर्जुनी, कटकवार विद्यालय साकोली व वैनगंगा शारीरिक शिक्षण ...

साकोली : स्थानीय वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात राजीव गांधी महाविद्यालय सडक-अर्जुनी, कटकवार विद्यालय साकोली व वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे टोकियो ऑलिंपिक खेळामध्ये सहभागी भारतीय दलाचे बळ वाढविण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर, प्रमुख अतिथी क्रीडा संघटक शाहीद कुरेशी, डॉ. सुनील चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी कुरेशी यांनी सांगितले की, जे आतापर्यंत झाले नाही ते आता होणार, जगाला दाखवायचे आहे की, हा भारत आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता एक वर्षानंतर ऑलिंपिक स्पर्धेला टोकियो येथे सुरुवात होत आहे. त्यात सहभागी झालेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या. डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, कोरोना काळातही आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. उत्कृष्ट शारीरिक, भावनिक आणि प्रतिस्पर्धी तयारीत कुठलीही कसर शिल्लक राहिलेली नाही. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरू शकेल. याच्या सकारात्मक लाभ होईल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. डॉ. चतुर्वेदी यांनी भारतीय दलाला ऑलिंपिक खेळासाठी शुभेच्छा देत चांगली कामगिरी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल गायकवाड, राजकुमार भगत, पल्लवी देशमुख, संजय पाखमोडे ,अरुण उपरीकर, विनोद गणवीर, गिरधर हटवार, मिथुन कुमार, अशोक कुमार, पुखराज लांजेवार, सादिक सय्यद यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निखाडे यांनी, तर आभार देवेंद्र इसापुरे यांनी मानले.