शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

झाडे लावा-झाडे जगवा नव्हे, झाडे वाळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:11 IST

एप्रिल महिन्यात आग ओकू लागला. केवळ माणसांनाच उन्हाचा त्रास होतो, असे नाही. झाडांनाही पुरेसे पाणी दिले नाही तर उन्हामुळे वृक्षही कोमेजतात. तुमसर नगरपरिषदेने चार वर्षापुर्वी भंडारा मार्गावर सिमेंट कुंडीमध्ये फुलझाडे लावली. मात्र आता पाण्याअभावी ही झाडे आता अखेरच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देतुमसरमधील प्रकार : भंडारा मार्गावरील वृक्ष मोजत आहेत अखेरची घटका

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एप्रिल महिन्यात आग ओकू लागला. केवळ माणसांनाच उन्हाचा त्रास होतो, असे नाही. झाडांनाही पुरेसे पाणी दिले नाही तर उन्हामुळे वृक्षही कोमेजतात. तुमसर नगरपरिषदेने चार वर्षापुर्वी भंडारा मार्गावर सिमेंट कुंडीमध्ये फुलझाडे लावली. मात्र आता पाण्याअभावी ही झाडे आता अखेरच्या घटका मोजत आहे. झाडे लावा, झाडे वाढवा नव्हे तर झाडे वाळवा, असाच प्रकार सध्या तुमसर शहरात दिसत आहे.भंडारा रोडवर दुपदरीकरणाचा रस्ता आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक असून या दुभाजकावर सिमेंट कुंडीत विविध प्रकारचे फुलझाडे लावण्यात आली आहे. लहान देखनी व टवटवीत झाडे नगरपरिषदेने तीन ते चार वर्षापुर्वी लावली होती. सध्या या झाडांचा आकार वाढला आहे. एप्रिल महिन्यात भर उन्हात ही झाडे कोमेजलेली दिसत आहे. सिमेंट कुंडीतील मातीही कोरडी पडली आहे. झाडांची पाने पुर्णत: गळून पडली आहेत, काही झाडे तर वाळण्याच्या मार्गावर आहे.नगर परिषद प्रशासनाने किमान दिवसातून एकदा या झाडांना पाणी देण्याची गरज आहे. हजारो रूपये यावर खर्च झाले. परंतु आता या झाडांना पाणीच दिले जात नाही. पाणी दिले नाही तर ही झाडे कशी वाचतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या प्रशासन लोकसभा निवडणुकीत गुंतले आहे. निवडणूक संपून आता दोन दिवस लोटले तरी या प्रकाराकडे नगरपरिषदेचे लक्ष नाही.सध्या तापमान ४२ अंशापर्यंत पोहचले आहे. अशा परिस्थितीत ही झाडे पाण्याअभावी वाळत आहे. मातीतील पोषक द्रव्य कमी होत आहे. शेणखत, गांढूळखत आदी देणे गरजेचे आहे. परंतु सध्यातरी नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार न६ाी.संवेदनशील मन हळहळतेयतुमसर शहराच्या प्रमुख मार्गावर कुंडीमध्ये असलेली ही झाडे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेते. टपोर फुलांनी हे वृक्ष बहरले की मन प्रसंन्न होते. मंद सुगंधही दरवळत असतो. परंतु आता या वृक्षांची अवस्था पाहून रस्त्याने जाणारे संवेदनशील मनाचे व्यक्ती हळहळताना दिसत आहे.