शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्प प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी गोसीखुर्द प्रकल्प प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना दिली. गोसीखुर्दच्या पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांनी येथे दिली. जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्चपर्यंत करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन वैनगंगा नदीचे जलपूजन करून बुधवारी येथे करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी प्रदूषित होण्यासाठी नाग नदीसोबतच इतरही घटक जबाबदार आहेत. नाग नदीच्या प्रदूषणाबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी गोसीखुर्द प्रकल्प प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना दिली. गोसीखुर्दच्या पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांनी येथे दिली.जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्चपर्यंत करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन वैनगंगा नदीचे जलपूजन करून बुधवारी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी  संदीप कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे, रा. गो. शर्मा, प्रशांत गोडे, सुहास मोरे, संदीप सातपुते, रवींद्र बानुबाकोडे, उल्हास फडके, मिलिंद जोशी उपस्थित होते. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असूनही प्रत्यक्ष वापरायोग्य पाणी अत्यंत कमी आहे. याचे कारण म्हणजे जलस्त्रोताचे प्रदूषण. पाण्याचा काटकसरीने वापर होणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच पाण्याचे प्रदूषण न करता गुणवत्ता राखणे महत्त्वाचे आहे, असे  जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता ज. द. टाले यांनी जलजागृती सप्ताहाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रास्ताविकेतून  कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे यांनी जलसंपदा विभागाद्वारे लोकसहभागातून घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.यावेळी मोटारसायकल रॅलीला जिल्हाधिकारी संदीप कदम व मुख्य अभियंता आशिष तु. देवगडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यात नागरिक सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प