शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कमी पाण्यामध्ये पिकाचे नियोजन करा

By admin | Updated: March 29, 2016 00:30 IST

शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल.

प्रज्ञा गोळघाटे यांचे प्रतिपादन : पवनी येथे कार्यक्रमपवनी : शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल. याबाबत काटकसरीचा वापर करुन कमीतकमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिकांचे नियोजन शेतकरी बांधवांनी करावे व उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोळघाटे यांनी केले.कृषि व्यवस्थापन संस्था (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी पवनी यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या जलजागृती अभियान अंतर्गत सुक्ष्म सिंचन पध्दतीने फायदे व ठिंबक तुषार संचाचे व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे वळावे व नफा मिळवावा असे सांगुन परंपरागत कृषी विकास, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी आदेशकुमार गजभिये, गोसेखुर्दचे सहायक अभियंता अहिरराव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. बारई, लागवड अधिकारी घरडे, पं.स.चे कृषी अधिकारी वानखेडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. पी. पर्वते, नेटाकिमचे कृषी विद्यावेतन धनंजय मेहत्रे, कृषी अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, याविषयीची माहिती तालुका कृषी अधिकारी ए. डी. गजभिये यांनी दिली व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मार्गदर्शन केले. धनंजय मेहत्रे यांनी पिकांना मोकाट पाणी देण्यापेक्षा ठिंबक व तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा असे सांगुन ठिंबक व तुषार सिंचन वापरण्याची पध्दत समजावून दिली. यावेळी सहायक अभियंता अहिरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी बारई, कृषी पर्यवेक्षक मेश्राम व हुमणे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पी. पी. पर्वते यांनी तर आभार कृषी अधिकारी वाघमारे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)