शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

तुमसर बपेरा राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST

१२ लोक ०८ के चुल्हाड (सिहोरा) : सिहोऱ्यातून जाणाऱ्या भंडारा बालाघाट राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ...

१२ लोक ०८ के

चुल्हाड (सिहोरा) : सिहोऱ्यातून जाणाऱ्या भंडारा बालाघाट राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. विकासाचे एक पाऊल पुढे सरकल्याचा अनुभव नागरिकांना घेतला आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाची अवस्था ग्रामीण रस्त्यासारखी झाली असताना, साधी दुरुस्ती करण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही. यामुळे अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. चौपदरीकरणांच्या कामांना सुरुवात करण्याची नागरिकांनी केली आहे.

भंडारा बालाघाट अशा महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. चौपदरीकरणातून रस्त्याचा विकास होणार आहे. सिहोऱ्यातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाने विकासाला उभारी मिळणार आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ, जागृत हनुमान देवस्थान तीर्थस्थळ, मिनी दीक्षाभूमी या स्थळांना भेट देणाऱ्याचे संख्येत वाढ होणार असून, परिसरातील अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे.

राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर, मोठे पोस्टर वार झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. दर्जा देण्याचे श्रेयावरून चर्चा झालेल्या आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाची कामे कधी सुरू होणार आहे, अशी माहिती सांगणारे कुणी नाही. श्रेयाचे पोस्टर्स व झळकणारे चेहरे गायब झाले आहेत. तुमसरपासून बपेरापर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यातून एक चाक निघाला की, दुसरा खड्डा तयारच असण्याचा अनुभव वाहन चालक घेत आहेत. रात्री या महामार्गाने प्रवास करताना जिकरीचे ठरत आहेत. खड्ड्यामुळे अपघात वाढले आहेत, परंतु साधी दुरुस्ती करण्यात येत नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुणी विचारत नाहीत.

राष्ट्रीय महामार्गाला खिंडाऱ्या पडल्या असल्याने मार्गावरून धावणारे वाहने कोसळत आहेत. कुणी हात पाय गमावून बसले आहेत. रस्त्याची रुंदी व नागमोडी वळणामुळे रस्ताच गायब झाला आहे. राज्य मार्गही राहिलेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यासारखी अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झाली आहे. सिहोरा ते बपेरापर्यंत रस्त्याची अवस्था भयावह झाली आहे. खड्डेच खड्डे, खिंडारी पडल्याने वाहन चालकांचा जीव भांड्यात राहत आहे. सिंदपुरी गावांचे शेजारी दोन दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. सर्वाधिक अपघात याच रस्त्यावर जागेवर घडले आहेत. राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्याची ओरड आहे. चौपदरीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली नाही, याशिवाय हालचालींना वेग देण्यात आले नसल्याने शंका निर्माण होत आहे.

परिसरातील बहुतांश रस्ते खड्ड्यात :- ग्रामीण भागात असणारी रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या रस्त्यांनी पायदळ चालणे मुश्कील झाले आहे. परसवाडा, रेंगेपार, पांजरा, गावाला जोडणारा रस्ता त्रासदायक झाला आहे. सिहोरा ते गोबरवाही रस्ता खड्ड्यात गेला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची ओरड जुनीच आहे, परंतु निधी नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी नागरिकांचे जीव वेशीवर टांगले जात आहे. गोबरवाही मार्गावरून वर्दळ अधिक आहे. बपेरा ते सुकली नकुल, देवरी देव चुल्हाड मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. तत्काळ रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी युवानेते पिंटू हूड, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी केली आहे.