शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

खांब कोसळला; २६ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:11 IST

कारधा टोल प्लाझा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारांमध्ये बिघाड आला. परिणामी गडेगाव उपकेंद्रातून अनेक फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला.

ठळक मुद्देरात्र उकाड्यात : वीज कंपनीविरूद्ध आक्रोश, १० तासानंतर वीज पुरवठा पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कारधा टोल प्लाझा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारांमध्ये बिघाड आला. परिणामी गडेगाव उपकेंद्रातून अनेक फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. याचा फटका भंडारा व लाखनी तालुक्यातील शेकडो नागरिकांना बसला. ६ मे रोजी रात्री १ वाजतापासून जवळपास अनेक गावातील शेकडो नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली़ वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांनी वीज वितरण कंपनीविरूध्द संताप व्यक्त केला़महाराष्टÑ राज्य शासनाने राज्य भारनियमन मुक्त झाल्याची घोषणा केली असली तरी भंडारा जिल्ह्यात विजेचा लपंडाव नित्याचेच झाले आहे. परिणामी ऊन्हाच्या चटक्यासोबत तांत्रिक कारणांची झळ नागरिकांच्या मानगुटीवर बसली आहे. पारा ४४ अशांवर असताना रविवार रोजी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली नसतानाही ३३ के. व्ही. गडेगाव उपकेंद्रातील वीजपुरवठा खंडीत झाला. याविषयी माहिती जाणून घेतली असता कारधा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे धारगाव फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत असल्याचे सांगण्यात आले. परीणामी गडेगाव उपकेंद्रातंर्गत असलेल्या लाखनी, एमआयडीसी, गडेगाव व धारगाव या फिडरमार्फत असलेल्या अनेक गावांचा वीज पुरवठा रात्री ९ वाजता खंडीत झाला़ वीज अधिकाºयांनी रात्रभर नादुरुस्त वीज तारांची दुरुस्ती केली.अखेर १० तासानंतर वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला. दरम्यान लाखनी व भंडारा तालुक्यातील शेकडो नागरिकांना मात्र डासांच्या प्रादूर्भावात रात्र उकाड्यात काढावी लागली. वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली.वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञरविवारला भंडारा व लाखनी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली, या विषयी वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते अनभिज्ञ असल्याचे कळले. अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी याविषयी उपविभागिय अधिकारी बी. ए. हिवरकर यांच्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. तर हिवरकर यांनी रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात असल्याने नंतर संपर्क करणार असल्याचे सांगितले. तीन ते चार तासानंतर त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर दोनदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.गावकऱ्यांनी रात्र काढली जागूनआमगाव/दिघोरी : धारगाव विद्युत उपकेंद्रांतर्गत येत असलेले २६ गावातील विद्युत पुरवठा रात्री १ वाजेपासून खंडीत झाल्याने अंधार पसरला होता. विद्युत खंडित झाल्याने गावकऱ्यांची रात्री झोपण्याची गैरसोय झाली होती. चौकाचौकामध्ये गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. राष्ट्रीय महामार्ग कारधा येथे एका ट्रकने विद्युत खांबाला धडक दिल्याने लाखनीपर्यंत वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या सयंत्रावरुन विद्युत पुरवठा बंद झाला. हे काम सुरळीत करण्यासाठी सकाळ उजाडवी लागली. रात्रीला १ वाजेपासून विद्युत बंद होती. कुलर पंखा यांची सर्वांना सवय झाल्याने गावकऱ्यांची झोपमोड झाली. अनेकांनी आपले अंधरुण अंगणामध्ये काढले. लहान मुलाना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. तान्ह्या मुलांना झोपविण्यामध्ये मोठ्याची फार पंचाईत झाली.कारधा नजिकच्या पथदिवा खांबाला ट्रकने धडक दिल्याने कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाºया वीज तारावर खांब कोसळला. त्यामुळे गडेगाव उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. धारगाव फिडवरील २६ गावे अंधारात होती. लाखनी फिडरला 'बॅक फिडींग' देण्यात आल्यामुळे तेथील वीजपुरवठा सुरळीत होता. क्रेनच्या सहायाने खांबावरील वीज तारा काढण्यात आली. रात्रभर केबलची दुरूस्ती करण्यात आल्यानंतर सकाळपर्यत वीज पुरवठा सुरू करण्यात आला़- एम. के. सिंहकनिष्ठ अभियंता, धारगाव