शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नीलगाईच्या पिलाला जीवनदान

By admin | Updated: November 5, 2015 00:40 IST

वनपरिक्षेत्रातील बीट क्रमांक ३०४ ताशाच्या पाटाजवळ कळपातून भरकटलेल्या नीलगाईच्या पिलाला परिसरातील शेतकऱ्यांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात आणून...

पवनी येथील घटना : ‘मैत्र’चे सर्वत्र कौतुकपवनी : वनपरिक्षेत्रातील बीट क्रमांक ३०४ ताशाच्या पाटाजवळ कळपातून भरकटलेल्या नीलगाईच्या पिलाला परिसरातील शेतकऱ्यांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात आणून मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था पवनीचे पदाधिकाऱ्यास माहिती दिली. असता संस्थेचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी जावून नीलगाईच्या भरकटलेल्या पिल्लास पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पवनी तालुक्यातील काही भाग समाविष्ट असल्यामुळे या राखीव जंगलात मुक्तपणे संचार करणारे अनेक वन्यजीव पाहावयास मिळतात. असेच बीट क्रमांक ३०४ मध्ये मुक्तपणे संचार करणाऱ्या नीलगाईच्या कळपातून नीलगाईचे पिल्लू भरकटल्यामुळे तो पिल्लू गावाच्या दिशेने येत असताना कुतूहल म्हणून काही शेतकऱ्यांनी त्याला गावात आणले व मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्थेचे सचिव माधव वैद्य, उपाध्यक्ष महादेव शिवरकर यांना माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) ए.ए. माने यांना भ्रमणध्वनीवर माहिती देऊन तातडीने बेलघाटा वॉर्डात नीलगाईचे पिल्लू असलेल्या स्थळी दाखल झाले व सदरचे पिल्ले हे जंगलातील नीलगाईचे असल्याची खात्री करून त्याला पकडून वनविभागाचे कार्यालयात वनपरिक्षेत्राधिकारी ए.ए. माने यांचे सुपूर्द केले. त्याला सुरक्षितपणे जंगलात सुरक्षित स्थळी सोडण्याची मागणी केली. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष खेमराज पचारे, उपाध्यक्ष महादेव शिवरकर, सचिव माधव वैद्य, सदस्य संघरत्न धारगावे, महेश मठीया, अमोल वाघधरे, चेतन हेडावू तसेच नीलगाईच्या पिलाला जीवनदान देण्यास मोलाचे सहकार्य करणारे भगवान सोमनाथे, मानापुरे, वनपरिक्षेत्राधिकारी माने, प्रतिक चावरे, मोरेश्वर राऊत व अन्य उपस्थित होते. (तांलुका प्रतिनिधी)