शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडास्पर्धांमुळे शारीरिक विकास

By admin | Updated: December 26, 2016 01:01 IST

चांगल्या अन्नाद्वारे निरामय मानवी शरीर प्राप्त करता येते. त्याचप्रमाणे व्यायाम व क्रीडाप्रकाराने शरीर बलवर्धक बनविता येते.

शाहीद कुरैशी यांचे प्रतिपादन : कटकवार विद्यालयात क्रीडासत्राला प्रारंभ साकोली : चांगल्या अन्नाद्वारे निरामय मानवी शरीर प्राप्त करता येते. त्याचप्रमाणे व्यायाम व क्रीडाप्रकाराने शरीर बलवर्धक बनविता येते. क्रीडेमुळे शारीरिक कार्यक्षमतेचा विकास होतो. म्हणजेच एखादे काम केल्यानंतरही थकवा न येणे किंवा आलेला थकवा लवकर नष्ट होणे व अधिक सहनशक्ती निर्माण होते असे प्रतिपादन क्रीडासंघटक शाहीद कुरैशी यांनीकेले. कटकवार विद्यालयात आयोजित आंतरशालेय क्रीडासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. क्रीडासत्राच्या उद्घाटनप्रसंगी वरिष्ठ शिक्षक हिवराज येरणे, प्रा.उत्तम गायधने, प्रा.संजय पारधी, शिवदास लांजेवार, बाळकृष्ण लंजे, क्रीडासंघटक शाहीद कुरैशी, क्रीडाशिक्षक संजय भेंडारकर उपस्थित होते. वर्ग ५ ते १२ कला व विज्ञान विभागाच्या मुलामुलींच्या कबड्डी खोखो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हिवराज येरणे यांनी याप्रसंगी सांगितले की, क्रीडास्पर्धा हा सामाजिक एकतेचा व जनसमुदाय गोळा करण्याचा चांगला मार्ग आहे. म्हणून अशा स्पर्धाचे आयोजन होणे गरजेचे आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून शिवपाल चन्ने, भोजराम मांदाळे, दिनेश उईके, विठ्ठल सुकारे, सोनवाने, सुनिल मोहनकर, प्रा.विनोद हातझाडे, प्रा.केशव कापगते, प्रा.प्रशांत शिवणकर, प्रा.भालेराव, प्रा.लांजेवार यांनी काम पाहिले. विजयी उपविजयी संघाचे कौतूक संस्थासचिव विद्या कटकवार यांनी केले.