शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भंडाऱ्याचे छायाचित्र राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:52 IST

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र माझा' छायाचित्र स्पर्धेतील निवडक सर्वोत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन नागपूर येथे भरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धा : सुरेश फुलसुंगे, तुमसरचे मृगांक वर्मा यांच्या छायाचित्राची निवड

आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र माझा' छायाचित्र स्पर्धेतील निवडक सर्वोत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन नागपूर येथे भरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनीत भंडारा येथील वरिष्ठ छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे व तुमसर येथील युवा छायाचित्रकार मृगांक वर्मा या दोन छायाचित्रकारांच्या छायाचित्रांना स्थान मिळाले आहे.मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने महाराष्ट्र माझा हे राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले. यात राज्यातील छायाचित्रकारांनी काढलेली उत्कृष्ट व निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत.स्पर्धेत ‘सोलर पैनल ने केली किमया’ या मथळ्यांतर्गत शेतातील विहिरीवर बसविलेल्या सोलर पॅनलचे आकर्षक छायाचित्र प्रदर्शित करण्यात आले आहे. हे छायाचित्र जिल्ह्यातील तुमसर येथील छायाचित्रकार मृगांक वर्मा यांनी काढले आहे. तुमसर तालुक्यातील सात हजार लोकसंख्येच्या येरली या गावातील हे छायाचित्र आहे. येरली येथे चार शेतकºयांनी शासनाच्या जवाहर विहीर योजनेचा लाभ घेत अवर्षणातही सिंचन साध्य करून शेतात हिरवळ आणली. वर्मा यांच्या छायाचित्राला प्रदर्शनात आलेल्या दर्शकांनी दाद दिली.आयुष्याचे ओझे सहजतेने पेलणाऱ्या इसमाचे छायाचित्र भंडारा येथील सुरेश फुलसुंगे यांनी काढले आहे. डोक्यावर टोपल्या घेऊन लाखनी येथे विकायला जाणाऱ्या बुरड कामगाराचे छायाचित्र सुरेश फुलसुंगे यांनी टिपले आहे. फुलसुंगे यांचे छायाचित्र गेल्या वर्षीच्या प्रदर्शनीत सुद्धा सामाविष्ट करण्यात आले होते. फुलसुंगे यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेणारे असून या छायाचित्राचे अनेकांनी कौतूक केले आहे.महाराष्ट्र माझा राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत राज्यातून ३ हजार २०० छायाचित्र आले होते. निकालानंतर २०० निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.