शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:20 IST

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे. केंद्र व राज्य सरकारने याप्रकरणी वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणारा धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देणारा योग्य न्याय प्रदान करावा, अशी मागणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मिशनने केली आहे.क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्रज राजवटीत अन्याय, अत्यचार, शोषणाविरुद्ध लढा उभारला होता. तसेच भारत देशातील शोषित पीडित सामान्य नागरिकांना त्यांचे जन्मजात हक्क, अधिकार मिळावे यासाठी जीवाचे रान केले आणि पुण्यामध्ये १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करून बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दार खुले केले. यास भारत देशातील जातीवादी व्यवस्थेने त्यांचा फार मोठा विरोध केला होता. परंतु त्यास न जुमानता क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण क्षेत्रात तयार करून त्यांचे शैक्षणिक जबाबदारी सोपविली व सावित्रीबाई फुले यांना कशाचीही तमा, मान सन्मान न पाहता ती जबाबदारी निर्भीडपणे पार पाडली आहे. सावित्रीबाई फुले या भारत देशातील बहुजन समाजाच्या पहिल्या आद्यशिक्षिका आहेत. साथ पसरली असता रुग्णांची सेवा करताना त्या मृत्यू पावल्या. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना शेतकरी, शेतमजूरांच्या उत्थानासाठी बरेच भरीव कार्य केले असून शेतकºयांच्या आसूड या ग्रंथात शेतकºयांबाबत विस्तृत लेखन करून शेतकºयांचे हित जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे फुले दांपत्यांचे कार्य सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रास प्रेरक ठरत असून नवी दिशा देणारे असताना या दांपत्यांना अजूनपर्यंत या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. हे न्याय व तर्कसंगत नसून याबाबद संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून बहुजन समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन व मानविद्य दृष्टीकोनातून सम्यक विचार विनिमय करून क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून तमाम नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशनचे जिल्हाअध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, गौतम कानेकर, इंजि. अजय रंगारी, अशोक बागडे, धनराज कानेकर, अशोक फुलेकर, हितेंद्र मेश्राम यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.