शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांवरील मनमानी ठरणार जीवघेणी!

By admin | Updated: January 3, 2015 00:36 IST

अतिज्वलनशील पदार्थांचा साठा ज्याठिकाणी असतो, त्या पेट्रोल पंपावर मात्र सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’ मध्ये उघडकीस आला आहे.

भंडारा : पेट्रोल, डिझेल हे ज्वलनशील पदार्थ हाताळताना अतिशय काळजी घ्यावी लागते. परंतु, या अतिज्वलनशील पदार्थांचा साठा ज्याठिकाणी असतो, त्या पेट्रोल पंपावर मात्र सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’ मध्ये उघडकीस आला आहे.भंडारा जिल्ह्यात एकाही पेट्रोलपंपावर पेट्रोलियम कंपन्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालनही केले जात नाही. याला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात एखाद्या मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसागणिक दुचाकी-चारचाकी वाहनांची संख्या सर्वत्र वाढत आहे. त्यासोबतच पेट्रोल-डिझेलची मागणीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. परंतु, पेट्रोलपंपसाठी असलेल्या नियमावलीचे पालन मात्र कुठेही होताना दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर एखादा अपघात घडल्यास किंवा नियमबाह्यरित्या विकल्या जाणाऱ्या खुल्या पेट्रोलचा दुरूपयोग झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मुख्य कंपन्यांचे पेट्रोल आणि डिझेल पंप जिल्ह्यात आहेत. या तिन्ही कंपन्या सरकारच्या नियंत्रणाखाली चालतात. त्यासाठी त्या-त्या कंपन्यांचे पेट्रोल पंपांसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचे पालन होते किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर असते. मात्र, ज्या पद्धतीने नियमांची पायमल्ली होत आहे, त्यावरून पेट्रोल पंपांची तपासणी होत नसल्याचे दिसून आले आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सात पेट्रोलपंप आहेत. यापैकी सहा पेट्रोलपंप सुरू आहे. त्यापैकी राष्ट्रीय महामार्गावर पाच पेट्रोलपंप आहेत. शहराच्या मध्यभागी एक तर भंडारा-तुमसर राज्य मार्गावर एक पेट्रोलपंप आहे. शहरातील या पेट्रोलपंपावरील सुविधा नाममात्र असून प्रत्येक पेट्रोलपंपावर कुठल्या ना कुठल्या सुविधांचा अभाव आहे. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’ मध्ये शहरातील काही पेट्रोलपंपवर शिशीमध्ये पेट्रोल मागितले असता पेट्रोल देण्यात आले. यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. या पंपावर पेट्रोल भरुन देणारा कर्मचारीही पेट्रोल देण्यासाठी नकार दिला नाही. यावरून तेथील कर्मचाऱ्यांना वाहनाशिवाय डबकी व शिशीत पेट्रोल देता येत नाही, या नियमाची जाणीव नसावी, असे यावेळी दिसून आले. (लोकमत चमू)पेट्रोल-डिझेल पंपावर सुरक्षेच्या दृष्टीने मोबाईलचा वापर कुणीही करू नये. एखाद्या ग्राहकाने मोबाईल वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. खुल्या पद्धतीने पेट्रोल देणेही नियमबाह्य आहे. नागरिकांनीही गाईडलाईन्स पाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आमचे म्हणने आहे. पट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाल्यास त्याची अंमलबजावणी त्वरीत करण्यात येते. पयार्याने आधीच्या किंमतीत व आताच्या किंमतीत फरक असल्याने त्याचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.- सुभाष गुर्जर, संचालक, गुर्जर पेट्रोल पंप भंडारा.