शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी मोहरणा घाटाची, उपसा गवराळा घाटातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:14 IST

तालुक्यातील मोहरणा रेतीघाट नुकताच सुरू झाला असून, येथे पोकलँडने रेतीचा उपसा केला जात आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : मोहरणा रेती घाटावर पोकलँडने रेती उपसालोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील मोहरणा रेतीघाट नुकताच सुरू झाला असून, येथे पोकलँडने रेतीचा उपसा केला जात आहे. रेती उपसा करण्यासाठी मोहरणा घाटाला परवानगी असली तरी रेतीचा उपसा होत असलेले ठिकाण गवराळा हद्दीत येत आहे. या रेतीघाटातून टिप्परमधून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतुक सुरू आहे.दरवर्षी ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या भागातील विद्यार्थी लाखांदूरला ये-जा करीत असतात. मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. मागील १५ दिवसांपूर्वी पवनी तालुक्यातील बोरगाव येथील एका मुलीचा नाहक बळी गेला होता. अशीच वाहतूक सुरू राहिली तर अशा घटनांची पुनरावृती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परीसरात मोहरणा रेती घाटासह ईटान येथे रेती घाट सुरू आहे. दोन्ही घाटातून पोकलँडने रेतीचा उपसा करून ओव्हरलोड वाहतुक सुरू आहे. लाखांदुर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या भागातील नागरीक व विद्यार्थी नेहमीच लाखांदूरला येतजात असतात. याच मार्गाने रेतीचे ओव्हरलोड टिप्पर वाहतुक सुरू असते. रेती घाटामुळे लाखोंचा महसूल शासनाच्या घशात जमा होत असला तरी रस्त्याची मात्र वाट लागलेली आहे. ईटान घाटावर रेती उपसा करण्यासाठी परवानगी मिळालेल्या क्षेत्रातून अधिक भागात सात ते आठ मीटर रेतीचा उपसा केला जात आहे. मोहरणा रेती घाटाच्या नावाने गवराळा सिमेत उपसा सुरू आहे.