शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत सिंचनाची सुविधा

By admin | Updated: April 6, 2016 00:28 IST

मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचा स्तर खालावतो आहे.

आता मागेल त्याला शेततळे : उत्पन्न वाढविण्यासाठी होणार मदत लाखांदूर : मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचा स्तर खालावतो आहे. कोरडवाहू शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असते. जलस्तरामध्ये घट होण्याचा विपरित परिणाम शेती उत्पन्नावर झाला आहे. शेतीच्या उत्पादनात वाढ करणे तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरणार आहे.पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी जलसंवर्धन आणि पाणलोटच्या माध्यमातून सिंचनाची उपयुक्तता वाढविण्यासोबत संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. शेततळ्यांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी ठरेल. शेततळे कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांची जमीन शेततळ्यांकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. जेणेकरून पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी सामुदायिक शेततळे शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा. दारिद््रय रेषेखालील शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट व प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय प्रथम अर्ज करणाऱ्याची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात येईल. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मोठी मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना १५ बाय १५, २० बाय १५ व ३० बाय ३० आकाराचे शेततळे घेता येणार आहे. अनुदानाची कमाल मर्यादा ५० हजार इतकी राहणार आहे. यापेक्षा अधिक खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी) लाभार्थी शेतकऱ्यांकडे आवश्यकता आहेअधिकाधिक पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रितरीत्या सामुदायिक शेततळे करता येईल. त्यांना मिळणारे अनुदान, पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेदारी आदींबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून तो अर्जासोबत शेततळे करण्यास इच्छुक शेतकऱ्यांकडे जमिनीचा ७/१२, ८/अ चा उतारा, दारिद्र्यरेषेखालील कार्ड, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसाचा दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी योजना लाभदायक ठरू शकते.