शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By admin | Updated: May 24, 2015 01:19 IST

तालुक्यातील उमरी, अशोकनगर, फुलमोगरा या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,

भंडारा : तालुक्यातील उमरी, अशोकनगर, फुलमोगरा या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हा सचिव अशोक बागडे यांनी दिला.उमरी, फुलमोगरा, अशोकनगर हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या अगदी जवळ वसलेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे चौपदरी करण्याचे काम सुरु असतांना या गावांना पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन उखडल्यामुळे संबंधीत विभागाने पाणीपुरवठा करणे बंद केले होते. त्यामुळे पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात इतरत्र भटकावे लागत होते.उमरी, फुलमोगरा, अशोकनगर या गावावरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नवीन पाईपलाईन टाकून या गावांना पिण्याच्या पाण्याची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यानुसार पाईप लाईनची व्यवस्था करण्यात आली असेल तर नियमितपणे पाणी पुरवठा करणे ही संबंधित विभागाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु याकडे संबंधित विभागाच्या अधिनस्त यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मागील पंधरा दिवसापासून नळाद्वारे करण्यात येत असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांना काम धंदे सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे.नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात शासनाच्या विविध योजना आहेत. परंतु संबंधित विभाग सदर योजनांची अंमलबजावणी करण्यास दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभाग उमरी, फुलमोगरा, अशोकनगर या गावातील नागरिकांबाबत उपेक्षित धोरण अंगीकारून सापत्न वागणूक देत आहे हे अन्यायकारक आहे. या गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बंद असेल तर टँकरद्वारे पााणी पुरवठा केला पाहिजे. (नगर प्रतिनिधी)