शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

लोक अदालतीत समजुतीने पुन्हा बहरली संसारवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय यांच्यावतीने कौटुंबिक वाद प्रकरणे निकाली काढण्यात आली. कौटुंबिक न्यायालय येथे प्रलंबित असलेल्या प्रकरणात पॅनल अधिकाऱ्यासह दिवाणी न्यायाधीश पी. पी. देशमुख व कौटुंबिक न्यायालय विवाह समुपदेशक आर. पी. कटरे यांनी निर्णायक भूमिका बजावत संसार फुलविण्याची व मनोमिलनाची पक्षकाराला संधी दिली. कोणतेही नाते टिकवायचे असल्यास दोघांनी परस्परांना समजून घेणे महत्त्वाचे असते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संसार म्हणजे दोन अनोळखी माणसांनी आयुष्यभर सोबत करावयाचा प्रवास. या प्रवासात कधी सुख येते तर कधी दुःखे येत असतात. तरीदेखील एकमेकांना सोबत करायची...! कधी कधी या संसारात छोट्या गोष्टीवरून खटके उडतात. दुरावा निर्माण होतो. मात्र, आजच्या लोक अदालत आयोजनाची यशस्वी फलश्रुती भंडारा येथे पहावयास मिळाली. दुरावा आलेल्या जोडप्याने समजुतीने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय यांच्यावतीने कौटुंबिक वाद प्रकरणे निकाली काढण्यात आली. कौटुंबिक न्यायालय येथे प्रलंबित असलेल्या प्रकरणात पॅनल अधिकाऱ्यासह दिवाणी न्यायाधीश पी. पी. देशमुख व कौटुंबिक न्यायालय विवाह समुपदेशक आर. पी. कटरे यांनी निर्णायक भूमिका बजावत संसार फुलविण्याची व मनोमिलनाची पक्षकाराला संधी दिली. कोणतेही नाते टिकवायचे असल्यास दोघांनी परस्परांना समजून घेणे महत्त्वाचे असते. संसारात दोघांची भूमिका अहम असून दोघांनी टोकाची भूमिका न घेता सामंजस्यांने स्वतःच्या पुढाकाराने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. हे विशेषतः उल्लेखनीय असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी संदेश देत एकत्रित राहण्यास तयार झालेल्या जोडप्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता रोपटे देऊन शुभेच्छा दिल्या. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा व अधिनस्थ तालुका न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकाच दिवशी १ हजार ९४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात ३४७ प्रलंबित तर १ हजार ५९४ न्यायपूर्वप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालय, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालयामध्ये ही लोकअदालत आयोजित करण्यात आली.  याकरिता पॅनल सदस्य म्हणून न्यायाधीश व अधिवक्तागण यांनी काम पाहिले. लोकअदालतमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, पॅनल सदस्य, अधिवक्तागण, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य केले. लोकअदालतीच्या आयोजनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुहास प्र. भोसले यांनी सर्व न्यायीक अधिकारी, पॅनल सदस्य, अधिवक्ता, कर्मचारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी व पक्षकारांचे आभार मानले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- लोकअदालतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दोन प्रकरणात पक्षकार प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यामुळे पॅनल अधिकाऱ्यांसह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. पी. देशमुख यांनी व्हॉट्स ॲप व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क करून तडजोड घडवून आणली. तसेच सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. ए. पटेल यांनीदेखील दोन प्रकरणात व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क करून तडजोड घडवून आणली.

 

टॅग्स :Lokmatलोकमत