शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा बचावासाठी जनआंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:56 IST

नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा प्रदूषित

आॅनलाईन लोकमतभंडारा : नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. आता वैनगंगेला दूषित होण्यापासून वाचविण्याकरिता वैनगंगा बचाव जनआंदोलन करणार असल्याचा ईशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.भंडारा जिल्हावासियांसाठी वैनगंगा नदी ही जीवनदायीनी आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वैनगंगा नदी प्रदूषित नद्यांच्या यादीत गणल्या जात आहे. गोसेखुर्द धरणात नाग नदीचे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नाग नदीचे पाणी वैनगंगेत सोडणे थांबविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. १९ नोव्हेंबर २०१५ ला एका आदेशाद्वारे वैनगंगा नदीमध्ये दूषित पाणी आधी शुध्द करण्यात यावे व त्यानंतर वैनगंगेत सोडण्यात यावे, असा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. नागपूर महानगर पालिकेने नाग नदीचे दूषित पाणी शुध्द करण्याकरीता प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली होती.केंद्र सरकारकडून एनआरसीपी अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरूवात होणार होती. मात्र प्रकल्पाला मंजुरी कधी मिळेल? व मंजुरी मिळाल्यास प्रकल्प उभारण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल? या प्रश्नांची उत्तरे शासनाने दिलेली नाही. वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी आणखी चार वर्षे लागतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आणखी चार वर्षे हा प्रश्न सुटणार नाही का? असा सवाल करून आता जन आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा ईशाराही पटोले यांनी दिला. पत्रपरिषदेत माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, राजकपुर राऊत, उपस्थित होते.