शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: September 22, 2015 00:53 IST

सव्वा वर्षाचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. बेरोजगारांना रोजगार देणारे विदेशातून

पवनी : सव्वा वर्षाचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. बेरोजगारांना रोजगार देणारे विदेशातून काळा पैसा आणणारे, गरीबी हटविणारे भाजप सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. नागनदीचा दूषित पाण्याचा प्रश्न, गोसे धरणाचा डावा कालवा, मच्छीमारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भावाचा प्रश्न, उसाचा प्रश्न तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यामध्ये भाजप सरकार अयशस्वी ठरले आहे. जनतेचे प्रश्न जर सरकारने सोडविले नाही तर त्याकरिता आंदोलन करू, रस्त्यावर येऊ, असा इशारा खासदार प्रफुल पटेल यांनी दिला. पवनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, विलास काटेखाये, डॉ.विजय ठक्कर, डॉ.किशोर मोटघरे आदी उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. आपण लोकांना सोडून जाणार नाही. गोरगरीब जनतेचा कुणीही वाली नाही. याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेनी एकत्र येऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन केले. केवळ आढावा बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सुटत नाही, असाही टोला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारला. गोसे धरणात एकही पैसा त्यांनी दिला गेला नाही. उलट या सरकारने आमच्या सरकारनेच सुरु केलेल्या योजना बंद पाडल्यात. यावर त्यांनी खेद व्यक्त केला. प्रास्ताविक डॉ.किशोर मोटघरे यांनी केले. राजेश डोंगरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपली मतभेद विसरुन पक्षाची कामे हिरहिरीने करावीत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केशव आकरे, नागो शहारे, गोपाल वैरागडे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. खासदार पटेल यांचा विविध कार्यकारी सहसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. संचालन डॉ.अनिल धकाते यांनीतर आभार प्रदर्शन डॉ.राखडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)