शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

जखमी माकडामुळे लोक हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:23 IST

वन्यप्राणी, पक्षी सहवास जंगल नष्ट होत असताना राहणे व खाद्यासाठी वस्त्यांकडे धाव घेत आहे. परिणामी विजेचा धक्का लागणे,

परसोडी येथील घटना : मदतीसाठी प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : वन्यप्राणी, पक्षी सहवास जंगल नष्ट होत असताना राहणे व खाद्यासाठी वस्त्यांकडे धाव घेत आहे. परिणामी विजेचा धक्का लागणे, एकमेकाशी भांडण करणे यामुळे माकडाला प्राण गमवावे लागते. अशीच घटना परसोडी आरोग्य उपकेंद्राजवळ घडली. माकडाच्या जखमी पिल्याला वाचविण्याचे आरोग्य कर्मचाऱ्याचे प्रयत्न व्यर्थ ठरलेप्राथमिक आरोग्य उपकेंद्र परसोडी परिसरात असलेल्या घनदाट वृक्षांवर माकडांची वसाहत आहे. लगत असलेल्या आरोग्य उपकेंद्राच्या छतावर माकड व पिले एकमेकाशी खेळत किंवा भांडण करीत होती. दरम्यान दोन पिलाच्या भांडणाचा प्रकार विकोपाला गेला. पैकी एका पिलाला गंभीर जखम झाल्याने ते छतावर पडले. हे दृष्य पिल्याच्या आईने म्हणजे माकडाने पाहिले. आपले पिल्लू उठत का नाही हे चाचपण्यास सुरूवात केली. मात्र पिल्लू उठून बसत नव्हते. कारण त्या पिल्याचे पोट फाटलेले होते. माकडाने राधेश्याम बांगळकर यांच्या घरासमोर पिलाला ठेवले. पिल्याला गोंजारत मदतीचा टाहो फोडला. माकडाची पिलाप्रती मायेच्या ममतेने बांगळकर यांचे मन गहिवरले. उपकेंद्रातील देवतळे,साकुरे प्राथमिक उपचारासाठी धावून आले. वन विभागाला बोलाविले. पशुवैद्यकीय दवाखान्यात शर्थीचे प्रयत्न सुरू असता, पिलाने जीव सोडला. यावेळी मातेने ममत्वाने फोडलेला टाहो बघून सर्वांचे मन हेलावले.