शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना ४ महिन्यांपासून सरकारचा आधारच नाही; लाभार्त्यांच्या नशिबी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 13:09 IST

मोहाडी तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील निराधारांना गेले चार महिन्यांपासून आर्थिक मदत मिळालेली नाही. आपल्या बँक खात्यात सदर रक्कम जमा झाली आहे का हे पाहण्यासाठी वृद्ध नागरीक बँकेत हेलपाटे मारत आहेत.

ठळक मुद्देगाव नेत्यांना साकडे : बँकेचे झिजले उंबरठे

राजू बांते

भंडारा : निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे. परंतु, जून महिन्यापासून निराधारांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कमच आलेली नाही. गेल्या चार महिन्यांपासून वृद्ध बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. आता तर, गाव नेत्यांना वृद्ध साकडे घालत , ''दादा कई येतील गा माया खात्यात पैसे'' असा हृदय हेलावून टाकणारा प्रश्न विचारीत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना एक तारखेला वेतन मिळाला नाहीतर ते किती आटापिटा करतात हे अनेकांनी बघितले आहे. मात्र निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले यांना संजय गांधी निराधार योजनेतून दरमहिन्याला हजार रुपयाचे अनुदान मिळण्यासाठी चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. संयम व सहनशीलतेच्या पलीकडची सीमा पार केली असतानाही बिचारे आपली फिर्याद मांडत नाही.

वीस दिवसांवर दिवाळीचा सण येऊन पडला आहे. त्यामुळे हरदोली येथील चंद्रकला भोयर, मनाबाई झंझाड वृद्ध महिला राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष व गावाचे सरपंच सदाशिव ढेंगे यांच्याकडे गेली. दादा, बोहूत दिवस झाले न गा माया बँक खात्यात पैसे नाही आले न, मले आता औसद कोण देयेल गा उदारी, पाय न गा काही दिवसांवर दिवाळीबी येऊन रायली, कर न काही दादा असा मन हेलावून टाकणाऱ्या प्रश्नाने गाव नेते सदाशिव ढेंगे यांचे डोळे डबडबले.

२९ हजार निराधारांची फरफट

केंद्र शासनाने इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा, अपंग यांच्या अनुदानसाठी जून ते ऑगस्टपर्यंतचा २००-३०० रुपये हिस्सा तहसीलदार यांच्याकडे पाठविला आहे. परंतु राज्य शासनाने आपला हिस्सा पाठविला नसल्याने ३० हजार निराधारांची फरफट होत आहे. दिवाळीच्या तोंडावर तरी जून-ऑक्टोबरपर्यंतचा अनुदान देण्यात यावा, अशी मागणी वृद्धांनी केली आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनSenior Citizenज्येष्ठ नागरिक