शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संघटनेतर्फे पेन्शन बचाव परिषद

By admin | Updated: March 20, 2015 00:43 IST

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय येथे पेन्शन बचाव परिषदचे आयोजन करण्यात आले.

भंडारा : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय येथे पेन्शन बचाव परिषदचे आयोजन करण्यात आले. रामभाऊ येवले यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सदर परिषदेला सुनिल जोशी, अशोक थूल, चंद्रहास सूटे व लिलाधर पाथोडे यांनी उपस्थितांना अंशदायी पेन्शन योजनेबाबत संबोधित केले. त्यावेळी व्यासपीठावर दोन्ही संघटनांचे पदाधिकारी वसंतराव लाखे, रविंद्र तायडे, संजय पडोळे, रमेशराव व्यवहारे, गोविंदराव चरडे, अतुल वर्मा, एस.बी. भोयर, जाधवराव साठवणे, खुषरंग नागफासे आदी उपस्थित होते.मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव लाखे यांनी पेन्शन बचाव परिषदेचे प्रास्ताविक केले. लिलाधर पाथोडे म्हणाले, शासनाच्या कर्मचारी हितविरोधी धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीन गट पडले आहे. वैधानिक पेन्शन योजना लागू असणारे कर्मचारी, अंशदायी पेन्शन योजना लागू असणारे कर्मचारी, शासनाच्या नव्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणारे नवीन कर्मचारी, कर्मचाऱ्यांमध्ये असलेली एकजूट व संघर्षाची भूमिका यामुळे अजूनही भारतात ती राज्यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा येथे अंशदायी पेन्शन योजना लागू होवू शकली नाही. चंद्रहास सूटे म्हणाले १९९१ पासून नवीन आर्थिक धोरण भारतात लागू झाल्यापासून १९९१ ते २००३ पर्यंत ६ देशव्यापी संप झाले. २००५ पासून अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात सतत संघर्ष करून नारा देत आहोत.यासाठी अनेकदा एक दिवसीय संपही करण्यात आले. केंद्र सरकारने अंशदायी पेन्शन योजनेचे नियमन करण्यासाठी ६ फंड मॅनेजर्स नेमले आहे. ३२ कंपन्यासमोर आल्या आहेत. आज देशात ३ लक्ष लहानमोठे उद्योग बंद झाले आहेत. असंघटीत कामगारांची संख्या दोन कोटीच्या आसपास आहे. नवीन कर्मचाऱ्यांनी संघर्ष केल्याशिवाय अंशदायी पेन्शन योजनेच्या कायद्यात बदल होवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)