शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉर्प बांधणाऱ्या तरूणाईविरोधात थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:17 IST

पर्यटनस्थळावर गैरकृत्य तथा ओळख लपविण्यासाठी तरूणाई वर्षभर स्कॉर्प बांधून प्रवास करण्याची फॅशन केली आहे. या तरूणाईच्या विरोधात कवलेवाडा ग्रामपंचायतीने दंड थोपटले आहे. गावातून प्रवास करणाºया तरूणाई विरोधात कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देकवलेवाडा ग्रामपंचायतीचा पुढाकार : पोलीस कारवाई होणार, फलकाने वेधले लक्ष

रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : पर्यटनस्थळावर गैरकृत्य तथा ओळख लपविण्यासाठी तरूणाई वर्षभर स्कॉर्प बांधून प्रवास करण्याची फॅशन केली आहे. या तरूणाईच्या विरोधात कवलेवाडा ग्रामपंचायतीने दंड थोपटले आहे. गावातून प्रवास करणाºया तरूणाई विरोधात कारवाई केली जाणार आहे.गोंदिया जिल्ह्यात असणाºया तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायत आणि गावकºयांनी स्कॉर्प बांधून वाहनाने प्रवास करणाºया तरूणाई विरोधात दंड थोपटले आहे. स्कॉर्प बांधण्याची तरूणाईने सध्या फॅशन केली आहे. वर्षभर असे स्कॉर्प बांधून तरूणाई वावरत आहे. पर्यटन स्थळात तथा अन्य गर्दीचे ठिकाणी मुलीचे छेडखानीचे प्रमाण वाढले आहे. फॅशनचे तरूणाई न शोभणारे कृत्य करित आहे. चांदपूर पर्यटनस्थळ तथा कवलेवाडा धरण परिसरात तरूण तरूणींची गर्दी वाढली आहे. या दोन्ही ठिकाणी ये-जा करण्यासाठी कवलेवाडा गावातून तरूणाई स्कॉर्प बांधून दाखल होत आहे. यामुळे या तरूणाईची ओळख पटत नाही. अशा गर्दीचे ठिकाणी तरूणी सोबत गैरवर्तनाचे प्रकार घडले आहे. उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कॉर्प बांधण्याला विरोध नाही. परंतु हिवाळा आणि पावसाळ्यात या स्कॉर्प बांधण्याची गरज नसताना तरूणाई बेधुंद वागत आहे. स्कॉर्प बांधून गावातून प्रवास करताना अनेक अपघात घडली आहे. यामुळे वाहन धारकांची पळून जाताना ओळख निदर्शनास येत नाही. फॅशनचे नावावर अनेक अशोभनीय कृत्य तरूणाईचे हातातून घडत आहेत. यामुळे या फॅशनवर अंकुश घालण्यासाठी कवलेवाडा ग्रामपंचायत ने कंबर कसली आहे.धरण परिसरात या आशयाचे फलक लावून थेट कारवाईचा संदेश दिला आहे. गावातून तोंडावर रूमाल आणि चेहºयावर स्कॉर्प बांधून जाणारे तरूणाई विरोधात दंड थोपटण्यात येणार आहे. या तरूणाईला पोलिसाचे स्वाधीन केले जाणार आहे. धरण परिसरात लक्ष वेधून घेणाºया या फलकाची धास्ती तरूणाईने घेतली आहे.धरणाचे आवारात असे स्कॉर्प बांधणारी तरूणाई दिसून येत नाही. परंतु हिच तरूणाई पर्यटन स्थळ चांदपुरात दिसून येत आहे. गोबरवाही, टेमनी आणि चुल्हाड, सिहोरा मार्गाने स्कॉर्प बांधून तरूणाई दाखल होत आहे. या तरूणाई विरोधात अद्याप अंकुश घालण्यासाठी एकाही ग्रामपंचायतने पुढाकार घेतला नाही. सिहोरा परिसरातून हाकेच्या अंतरावर असणारे कवलेवाडा ग्रामपंचायतने स्कॉर्प हटाव मोहिमेला स्वच्छ समृद्ध गाव घडविण्याचे संकल्पनेत जोडले आहे. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम या गावाचे हद्दीत दिसून येत आहे. धरण शिवारात या फलकाने स्कॉर्प बांधणारे तरूणाईची गर्दी ओसरली आहे. हाच पॅटर्न सिहोरा परिसरात असणाºया ग्रामपंचायत राबविणार असल्याने दिसून येत आहे.कवलेवाडा ग्राम पंचायत मार्फत योग्य निर्णय घेतला आहे. समाजात चांगला संदेश जाईल. यामुळे स्कॉर्प बांधणारे तरूणावर अंकुश येणार असून हाच पॅटर्न चांदपूर गावात राबविणार आहे.-उर्मिला लांजे, सरपंच चांदपूर.स्कॉर्प बांधून तरूणाई बेधुंदपणे वावरत आहे. अनेक अशोभनीय प्रकार घडली आहे. स्कॉर्प बांधून प्रवास करणारे तरूणाईचे अपघात घडली आहे. या प्रकारावर आळा घातले पाहिजे.-सुनिता मोहनकर, उपाध्यक्ष महिला सेवा संघ सिहोरा.