शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बालरोगतज्ज्ञ पराग डहाके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:31 IST

राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग झिंगरजी डहाके यांचे दीर्घ आजाराने शनिवारला दुपारी १२.४५ वाजता नागपूर येथे निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ.पराग झिंगरजी डहाके यांचे दीर्घ आजाराने शनिवारला दुपारी १२.४५ वाजता नागपूर येथे निधन झाले. ३६ वर्षीय डॉ.पराग हे अविवाहीत होते. सामान्य लोकांना सेवा मिळावी, यासाठी ते जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत राहिले.जगात कुपोषणाची भयावहता लक्षात घेता आॅक्सफोर्ड विद्यापीठ लंडन, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन अ‍ॅकेडमी आॅफ पिडीयाट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने मे २०१६ मध्ये आॅक्सफोर्ड विद्यापीठात ‘कुपोषण’ या विषयावर बालरोग तज्ज्ञांचे जागतिक संमेलन पार पडले. या संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांचा गौरव केला होता.बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास यावर ‘एक्सीलेंस इन अ‍ॅकेडॅमिक्स अ‍ॅण्ड मेडिको सोशियल रिसर्च’साठी २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते डॉ.पराग यांना पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राने गौरविण्यात आले होते. त्यांच्यामागे आईवडिल, मोठा भाऊ, वहिणी असा आप्तपरिवार आहे. मितभाषी स्वभावाच्या परागच्या निधनाने जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सायंकाळी वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रवीशेखर धकाते, आमदार चरण वाघमारे यांच्या उपस्थितीत आयोजित श्रद्धांजली सभेत जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह नागरिक उपस्थित होते.