शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

समान काम समान वेतन द्या!

By admin | Updated: November 18, 2016 00:43 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना सर्वोच्च न्यालयालयाच्या आदेशानुसार

लोकप्रतिनिधींना आश्वासनाचा विसर : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणीभंडारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना सर्वोच्च न्यालयालयाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन देण्यात येवून अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार कोणतीही अट न ठेवता सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.राष्टूीय आरोग्य अभियानाची सुरुवात भारतात सन २००५ पासून करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात करण्यात येवून सरळ मुलाखती, परीक्षाद्वारे अभियानात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी स्वरुपात करण्यात आली. सदर अभियानातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी बरेचदा शासन सेवेत कायम करण्यात यावे, याकरिता आंदोलने, उपोषणे केली. १२ डिसेंबरला २०१२ ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रातील अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. त्यावेळेस त्या आंदोलनाचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी केले होते. आंदोलनातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना असे वचन, शब्द दिले होते की, आमची सरकार सत्तेत आली तर अभियानातील कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत विनाशर्त सामावून घेण्यात येईल. परंतु आज सत्तेत येवून दोन वर्ष झालेली असून आजपर्यंत सरकारणी कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाही. उलट मार्च २०१७ पर्यंत आदेश देण्यात यावे, असे आदेश निर्गमीत केलेत. त्यामुळे अभियानातील कर्मचारी, अधिकारी यांच्यावर शासनाची टांगती तलवार लटकत असल्यामुळे मानसिक तणावात काम करीत आहे.मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री यांनी आंदोलनात कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिाकरी व कर्मचाऱ्यांना विनाशर्त शासन सेवेत कायम करावे. समान काम समान वेतन या तत्वाचा अवलंब करून व न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून अभियानातील कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करण्यात यावे, अशी मागणी उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, कार्याध्यक्ष अतुल मेश्राम, कोषाध्यक्ष हेमंत भांडारकर, उपाध्यक्ष विनोद मेश्राम, प्रा.अनमोल देशपांडे, प्रा.मधुकर रुसेश्वरी, सल्लागार डॉ.मधुकर रंगारी, विधी सल्लागार विलास कान्हेकर, सहसचिव यशवंत उईके तसेच अभियानातील कार्यरत कर्मचारी राजू फुंडे, आशिष मारवाडे, गणेश आंबीलढुके, गिरी, सुषमा बांगडकर, प्रीती सिंग, परटक्के, सुषमा लुटे, शिला कान्हेकर, जनबंधू, लांबकाने, नागपूरे, अभियानातील सर्व कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. (नगर प्रतिनिधी)