शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी आयुष्यासाठी शरीराकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:17 IST

निवृत्तीच्या वयात जीवन निरोगी राहण्यासाठी शरीराकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिेजे, असे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश एस.जे. भट्टाचार्य यांनी केले.

ठळक मुद्देएस.जे. भट्टाचार्य यांचे प्रतिपादन: ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतभंडारा : निवृत्तीच्या वयात जीवन निरोगी राहण्यासाठी शरीराकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिेजे, असे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश एस.जे. भट्टाचार्य यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व कृतीशील निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संस्था, भंडारा जिल्हा, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर जिल्हा न्यायालयात घेण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख होते.शिबिराला जिल्हा न्यायाधीश-१ आर.पी. पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.पी. नायगावकर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.जे. भट्टाचार्य, मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर. शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.एम. धालीवाल, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.एच. राठी, चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.डी. मेंढे, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.ए. पटेल, न्यायालय व्यवस्थापक किशोर तलमले, पतंजली योग समितीचे रामविलास सारडा, कृतीशिल निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्थेचे कार्याध्यक्ष वसंतराव लाखे, कृतीशिल निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्थेचे जिल्हाध्यक्ष माधवराव फसाटे, तसेच कृतीशिल निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संस्था भंडाराचे सदस्यगण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडाराचे जी.जी. कडव, वरिष्ठ लिपिक आर.एस. निमजे, कनिष्ठ लिपिक, मोरेश्वर नंदनवार, कनिष्ठ लिपिक, राजेश गोन्नाडे उपस्थित होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.पी. नायगावकर म्हणाले, आज ज्येष्ठ नागरिकांसाठी नालसाने एक कायदा केला आहे. त्या कायद्याच्या माध्यमातून आज त्यांना अधिकार दिलेले आहेत. आज न्यायालयामध्ये बहुतेक खटले भावाभावात भांडणातून उद्भवल्याचे दिसून येते, पण असे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले तर, ते दोषी आईवडीलांना मानत असतात. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.जिल्हा न्यायाधीश - १ आर.पी. पांडे यांनी मानवी जीवनात आपल्या उत्तरार्धात आपल्याला कुणाची तरी गरज हवी असते. अशा वेळी आपल्याला कुणाचा आधार मिळाला नाही तर एकटेपणा जाणवते. पण आज जीवनात भांडणाचे प्रमाण वाढले व त्या माध्यमातून ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणजेच आज जी खटले समाजात होत आहेत. ती जास्तीत जास्त लोक अदालतच्या माध्यमातून सोडवावे.पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष शरद नखाते यांनी आपल्या संघटनेबद्दल माहिती देवून आज आमची संघटना समाजात उत्तम कार्य करीत आहे. समाजातील काही अडचणी असतील तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून समर्थपणे सोडवितो असे त्यांनी सांगितले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी आरोग्याची निगा, योग, तसेच योग्य आहार घेण्याबाबत ज्येष्ठ नागरिकांना संबोधित केले. ज्येष्ठ नागरिकांनी जास्त ताणतणावात जीवन न जगता जीवनात सहजगता आणावी, अशा प्रकारची बरीच उदाहरणे त्यांच्या पुढे देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.संचालन न्यायालय व्यवस्थापक किशोर तलमले भंडारा यांनी केले. आभार प्रदर्शन कृतीशिल निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संस्थेचे सचिव रत्नाकर तिडके यांनी केले.