लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तीन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरकुलाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अनेक घरकुलाचे काम अर्धवट अवस्थेत अडकून पडले आहे. परिणामी लाभार्थींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली. पण दुर्देवाने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने पैसे अडकल्याचे लाभार्थ्यांना सांगण्यात येत असल्याचे समजते.नियमाप्रमाणे, पहिला हप्ता ४० हजार, दुसरा हप्ता ४० हजार, तिसरा हप्ता २० हजार व चवथा हप्ता फिनीशींगसाठी एक लाख व शेवटचा हप्ता पन्नास हजार रुपये काम पूर्ण झाल्यावर दिले जातात. साकोली नगरपरिषदेअंतर्गत या योजनेत ४७७ लाभार्थीना घरकूल मंजूर करण्यात आले. केंद्र सरकार या योजनेचे पैसे म्हाडामार्फत नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज संस्थाना पाठविले.यापैकी बºयाच घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. त्यांनी चौथ्या हप्त्याच्या रकमेची मागणी केली. इतरानाही झालेल्या कामाच्याप्रमाणात समाधानकारक रक्कम मिळाली नाही. आता लॉकडाऊनमुळे योजनेचे पैसे स्थानिक स्वराज संस्थेपर्यंत न पोहचल्याने लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही.३२३ चौरस फुट जागेत बांधकाम झाले पाहिजे. ज्यांच्याकडे दुसरी जागा नाही त्यांनी आपले जुने मोडकडीस आलेले घर पाडून घरकुलांसाठी जागा खाली केली व पावसाळ्यापूर्वी घर पूर्ण होईल, या आशेने उघड्यावर आपला संसार थाटला. तर काहीनी पावसाळ्यापूर्वी घर खाली करुन देण्याच्या अटीवर परिचित, मित्र किंवा नातेवाईकाच्या रिकामे घर तात्पुरते भाड्याने घेऊन संसार उभा केला. पावसाळा पाहून घरमालकानी लाभार्थ्यांकडे घर रिकामे करण्याचा तगादा लावला. तर ज्यांनी उघड्यावर हिवाळा, उन्हाळा काढला आता घरकूल पूर्ण न झाल्याने त्यांनी आश्रय कुठे घ्यावा, असा प्रश्न आहे.
प्रधानमंत्री घरकूल योजनेची रक्कम तातडीने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST
नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली.
प्रधानमंत्री घरकूल योजनेची रक्कम तातडीने द्या
ठळक मुद्देलाभार्थ्यांची मागणी : साकोली नगरपरिषदेअंतर्गत ४७७ लाभार्थ्यांंना घरकूल मंजूर