शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत पोलिस वसाहत दुर्लक्षित

By admin | Updated: June 19, 2015 01:00 IST

इंग्रजांच्या काळात आणि नंतर कित्येक वर्षे हाफपँटवाले पोलिस होते. पोलिसांचे गणवेश बदलले, राहणीमानात बदल झाला. अलिकडे सर्व माहिती इंटरनेटवर जायला लागली.

अशोक पारधी पवनीइंग्रजांच्या काळात आणि नंतर कित्येक वर्षे हाफपँटवाले पोलिस होते. पोलिसांचे गणवेश बदलले, राहणीमानात बदल झाला. अलिकडे सर्व माहिती इंटरनेटवर जायला लागली. परंतु पोलिस ठाण्याच्या बाजूला उभ्या जिर्णावस्थेत असलेल्या ब्रिटीशकालीन पोलिस वसाहतीच्या दोन इमारती अजूनही वापरात आहेत. पोलिस वसाहत मातीच्या भिंती उभारुन निर्माण करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर कित्येक वर्षांनी निर्माण केलेली आवार भिंत पाडून नव्याने आवार भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. आवार भिंतीने पोलिसांची काय सोय होणार? असा प्रश्न विचारल्या जात आहे.पोलिस ठाण्याची इमारत २०८ चौरस मीटर जागेवर आहे. ६ निवासी गाळे असलेली एक वसाहत ५०० चौ. मी. जागेवर तर अन्य ६ निवासी गाळे असलेली वसाहत २८० चौ.मी. जागेवर बांधलेली आहे. पोलिस निरीक्षकांचे निवासस्थान १४४ चौ. मी. जागेत बांधण्यात आलेले आहे. बांधकाम असलेले क्षेत्र सोडून त्यापेक्षा अधिक मोकळी जागा उपलब्ध असताना जिर्ण पोलिस वसाहत निर्लेखित करुन नव्याने बांधण्याचे गरज आहे. परंतु दरवर्षी जिर्ण इमारतीवर, मोकळ्या जागेत सिमेंट काँक्रीट टाकून व आवारभिंत बनवून फार मोठी रक्कम खर्च करण्यात येत आहे. पंरतु पोलिस कर्मचाऱ्यांसाठी इमारत बनविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, शासनाचा गृहविभाग लक्ष केंद्रित करीत नाही. यात काम गौडबंगाल आहे, हे समजण्यास मार्ग नाही.पोलिस ठाण्यात १ पोलिस निरीक्षक, ३ पोलिस उपनिरीक्षक व ५० पोलिस हवालदार कार्यरत आहेत. पोलिस निरीक्षकांसाठी निवासस्थान आहे. परंतु पोलिस उपनिरीक्षकांना गावात भाड्याने राहावे लागते. तसेच १२ निवासी गाळ्यापैकी ३ गाळे राहण्यायोग्य नाही. केवळ ९ गाळ्यात पोलिस वास्तव्यात आहेत. उर्वरित ३१ पोलिस हवालदारांना गावात भाड्याने राहावे लागत आहे. पोलिस कर्मचारी २४ तास कार्यरत असल्याने त्यांना पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर निवास स्थान उपलब्ध झाल्यास विभागातील कामात गतीमानता आणता येईल. वसाहत निर्मितीच्या कामात प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून धूळखात आहे.