शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या दौऱ्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:26 IST

नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पूर्व विदर्भातील दौरा उर्जा देऊन गेला. रिलायंस उद्योग समूहाच्या कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी गोंदिया येथे आले असता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताच छत्तीसगढप्रमाणे राज्यातही धानाला २५०० रुपये हमीभाव देऊ, अशी ग्वाही दिली. शरद पवारांच्या या खेळीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली तर शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या.

ठळक मुद्देवाढीव हमीदराची हमी : छत्तीसगडप्रमाणे राज्यातही धानाला देणार भाव

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पूर्व विदर्भातील दौरा उर्जा देऊन गेला. रिलायंस उद्योग समूहाच्या कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी गोंदिया येथे आले असता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताच छत्तीसगढप्रमाणे राज्यातही धानाला २५०० रुपये हमीभाव देऊ, अशी ग्वाही दिली. शरद पवारांच्या या खेळीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली तर शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गत आठवड्यात गोंदिया दौऱ्यावर आले होते. रिलायन्स उद्योग समूहाच्या कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. निमित्त कोणतेही असले तरी शरद पवार यांच्या डोळ्यापुढे शेतकरी कायम असतो. त्यामुळेच त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना शेतकºयांच्या जीव्हाळ्याच्या विषयावर महत्वपूर्ण वक्तव्य केले. आमचे सरकार आले तर धानाला २५०० रूपये हमी भाव देवू, असे सांगितले.धानाच्या हमीभावासोबतच कापूस आणि सोयाबीनसाठीसुद्धा महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असे सांगितले. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे कृषीमंत्री म्हणून बजावलेली भूमिका सर्वविधीत आहे. त्यामुळेच शरद पवारांची ही घोषणा नक्कीच साधी नसावी. त्यांना शेतकºयांना खूशच करायचे असते तर छत्तीसगढपेक्षा अधिक रक्कमेची ग्वाहीही देता आली असती. मात्र त्यांनी प्रत्यक्ष जेवढे समर्थन मूल्य देता येईल तेवढ्याच रक्कमेची ग्वाही दिली. आम्ही निश्चितच २५०० रूपये धानाला समर्थनमूल्य देवू शकतो, असा संदेश शरद पवारांना द्यायचा होता.शरद पवारांनी दिलेली २५०० रूपये हमीभावाची ग्वाही हवेत विरणारी नाही, हे या भागातील शेतकरी जाणून आहेत. विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगतच्या छत्तीसगढ सरकारने शपथ ग्रहण करताच धानाला २५०० रूपये हमी भावाची घोषणा केली. छत्तीसगढ सरकार करू शकते तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमचे सरकार आले तर छत्तीसगढप्रमाणे समर्थन मूल्य देण्याची ग्वाही दिली. पवारांच्या या राजकीय खेळीने विदर्भाच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्य सरकार खळबळून जागे झाले असून धान उत्पादकांसाठी आपण काही करू शकतो का याची चाचपणी करू लागले आहे.एकंदरीत शरद पवारांचा पूर्व विदर्भाचा दौरा धान उत्पादक शेतकºयांसाठी आशा पल्लवीत करणारा तर सत्ताधारी पक्षासाठी निवडणुकीच्या तोंडावर वादळ निर्माण करणारा ठरला. आता धान मुल्याचा हा मुद्दा आगामी काही काळ गाजत राहणार हे तेवढेच खरे.शेतकऱ्यांसाठी प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकारराष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी या दौऱ्यांच्या निमित्ताने शरद पवार यांच्यापुढे पूर्व विदर्भातील धान उत्पादकांच्या व्यथा मांडल्या. गत अनेक वर्षापासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. वर्तमान परिस्थितीत धानाला १६०० ते १७०० रूपये हमी भाव दिला जातो. त्यात धान उत्पादकांची पिळवणूक होत असल्याचे लक्षात आणून दिले. एवढेच नाही तर प्रफूल पटेल यांच्या नेतृत्वात खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बनसोड, अनिल बावनकर, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल आदींनी एक निवेदन शरद पवार यांना दिले. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रभावाचा वापर करून एखादा प्रश्न कसा मार्गी लावता येवू शकते हे प्रफुल पटेल यांनी धान उत्पादकांच्या प्रश्नातून सिद्ध करून दाखविले. गोंदिया जिल्ह्यात सुरू झालेले कॅन्सर हॉस्पिटल ही प्रफूल पटेल यांचीच देणगी होय. अंबानी परिवाराशी असलेल्या कौटुंबिक सलोख्यामुळेच या जिल्ह्याला एवढेमोठे कॅन्सर रुग्णालय मिळाले.