शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

पवनीत मद्यपी पर्यटकांचा धिंगाणा

By admin | Updated: May 17, 2016 00:15 IST

पवनीपासून चार किमी अंतरावरील उमरेड - कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पवनी पर्यटन प्रवेशद्वारासमोर काही पर्यटकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला.

गुन्हा दाखल : वन्यजीवप्रेमींमध्ये संतापपवनी : पवनीपासून चार किमी अंतरावरील उमरेड - कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत पवनी पर्यटन प्रवेशद्वारासमोर काही पर्यटकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. या घटनेमुळे पवनी तालुक्यातील वन्यप्रेमी संतप्त झाले आहेत. १५ मे रोजी सायंकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास नागपूर येथील चार पर्यटक एम.एच.४९/यु.१६०९ या पांढऱ्या रंगाच्या मारूती कारने जंगल सफारीकरीता आॅनलाईन बुकींग करून आले. आधीच मद्यप्राशन करुन आलेल्या या पर्यटकांच्या त्यांच्या वाहनात विदेशी दारूसुध्दा आढळून आली. त्यामुळे त्यांना जंगल सफारीसाठी प्रतिबंध घालण्यात आला. अभयारण्यात प्रवेशापासून वंचित राहावे लागल्यामुळे मद्य प्राशन केलेल्या या पर्यटकांनी तेथील वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मार्गदर्शकासोबत बाचाबाची केली व शिवीगाळ करुन मारण्याची व पाहून घेण्याची धमकी दिली. याप्रकरी घटनेची तक्रार वनरक्षक माधुरी न्यायमूर्ती यांनी पवनी पोलिसांत केली. त्यांच्या तक्रारीवरून नागपूर येथील अमित श्रीराम जाधव (३७), प्रफुल विठ्ठल लोही (३३), चंद्रकांत पांडुरंग वाघमारे (३७), सचिन संपत गुगसे या चारही पर्यटकांना पवनी पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांना सोडण्यात आले. चारही पर्यटाकवरिुध्द पवनी पोलीस ठाण्यात भादंवि सहकलम ८५(१), ६५(ई), मदाका सहकलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर वाहन जप्त केले असून पवनी पोलीस तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)