शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवनीची साक्षी जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:40 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८६.६४ टक्के लागला असून बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींनीच यंदा बाजी मारली आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल ८६.६४ टक्के : नागपूर विभागात भंडारा दुसऱ्या स्थानावर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल शुक्रवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८६.६४ टक्के लागला असून बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलींनीच यंदा बाजी मारली आहे.पवनी येथील वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिंनी साक्षी सुनिल घावळे ही जिल्ह्यातून पहिली आली. तिला ९९.२० टक्के गुण मिळाले आहेत. भंडारा येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी तोषिता गभने ९७.६२ टक्के घेऊन द्वितीय आली. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा तिसºया क्रमांकावर असताना दहावीच्या निकालात दुसºया स्थानावर राहिला आहे. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी आणि लाखांदूर या सातही तालुक्यातून या निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.भंडारा जिल्ह्यातील २८६ शाळेत झालेल्या दहावीच्या परीक्षेत १९ हजार १२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी १९ हजार ५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १६ हजार ५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ८ हजार २९४ मुले तर ८ हजार २१४ मुलींचा समावेश आहे. एकूण १९,०५४ विद्यार्थ्यांमधून २,५४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत.१६ शाळेचा निकाल शंभर टक्केभंडारा जिल्ह्यातील १६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात आयुध निर्माणी सेंकडरी स्कूल जवाहरनगर, जेसीस इंग्लिश हायस्कूल भंडारा, शंशाक माध्यमिक विद्यालय कवडसी, अंकुर विद्यालय भंडारा, अनुसूचित जाती नवबौद्ध मुलीची शाळा, युनायटेड कॉन्व्हेंट ठाणा (जवाहरनगर), गंगाबाई हायस्कूल चप्राड, बुराडे हायस्कूल डांभेविरली, विद्याविहार मंदिर लाखांदूर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मासळ, लोक विद्यालय पांढराबोडी, पवन पब्लिक स्कूल पवनी, महात्मा गांधी हायस्कूल बाम्पेवाडा, कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल साकोली, इंग्लिश मीडियम हायस्कूल तुमसर, प्रगती केंद्रीय अनूसूचित जाती माध्यमिक निवासी शाळा बपेरा यांचा समावेश आहे. आठ दिवसांपूर्वी जाहिर झालेल्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील २६ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला होता. दहावीच्या २८६ आणि बारावीच्या १५४ शाळांच्या तुलनेत शंभर टक्के निकालाच्या शाळांमध्ये बारावीचा निकाल सरस ठरला आहे.निकालात लाखनी तालुका अव्वलदहावीच्या निकालात लाखनी तालुक्याचा ८९.८९ टक्के निकाल सर्वाधिक राहिला. लाखनी तालुक्यातील २५ शाळेतून १ हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७९१ मुले आणि ६४० मुली असे १,४३१ विद्यार्थी ऊत्तीर्ण झाले. मुलांची टक्केवारी ८७.७९ इतकी असून मुलींची टक्केवारी ९२.६२ इतकी आहे. पवनी तालुक्याचा निकाल ८४.३४ टक्के लागला असून हा निकाल जिल्ह्यात सातव्या स्थानावर आहे.मुलींनीच मारली बाजीबारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही मुलींनी आघाडी घेतली आहे. या परीक्षेत एकूण ९ हजार ९७९ मुले आणि ९ हजार ७५ मुलींनी परीक्षा दिली. यात ८ हजार २९४ (८३.११ टक्के) मुले ऊत्तीर्ण झाले तर ८ हजार २१४ (९०.५१ टक्के) मुली ऊत्तीर्ण झाले आहेत.