पवनी येथे कॉंग्रेसने काढली सायकल रॅली.
१३ लोक १५ के
पवनी : इंधनाची बेसुमार दरवाढीचा झाल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. वाढणाऱ्या महागाईस जबाबदार असलेल्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पवनी तालुका व शहर कॉंग्रेस, तालुका व शहर युवक काँग्रेस व अन्य सेलच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीदरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
रॅलीचे सुरुवात कॉंग्रेसचे कार्यालय असलेल्या गांधी भवनपासून करण्यात आली. रॅलीची सांगता प्रभु पेट्रोलियम बेटावर(पवनी) येथे करण्यात आली. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विकास राऊत, माजी पं. स. सभापती बंडू ढेंगरे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव धर्मेंद्र नंदरधने, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, तालुका अनु.जाती सेलचे अध्यक्ष अवनती राऊत, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष सुलतान अली, महिला कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्ष शालु टेकाम, मीरा उरकुडकर, निला पाथोडे , वंदना नंदागवळी, शालिनी नंदरधने, याचना बारापात्रे, रत्नमाला तेलमासरे, रोशनी नंदरधने, पूजा दडवे, वेणू नंदागवळी, रजीया शेख, अल्का फुंडे, तुळशीदास बिलवने, अनिल बावनकर, भगवान नवघरे, नरेंद्र बिलवने, श्याम धनविजय, किशोर लोणारे, लीलाधर मोहरकर , डॉ. रामचंद्र पाटील, प्रकाश भोगे, राजेश तलमले, शशिकांत भोगे, अनिकेत गभने, अमित पारधी, महेश नान्हे, चेतन हेडाऊ , तुषार भोगे, अक्षत नंदरधने व कॉंग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी बंडूभाऊ सावरबांधे, मोहन पंचभाई, विकास राऊत, माणिकराव ब्राह्मणकर, शंकरराव तेलमासरे यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करून मोदी सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले असल्याची भावना व्यक्त केली.