शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ दुकानदारांना गाळे मिळणार

By admin | Updated: January 13, 2017 00:12 IST

जिल्हा प्रशासनाने फुटपाथ दुकानदारांची कोणतीही तगा न बाळगता अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू करीत सर्व फुटपाथ धारकांची दुकाने जमिनदोस्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : शिवसेनेच्या उपोषणाची सांगाताभंडारा : जिल्हा प्रशासनाने फुटपाथ दुकानदारांची कोणतीही तगा न बाळगता अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू करीत सर्व फुटपाथ धारकांची दुकाने जमिनदोस्त केली. त्यामुळे फुटपाथ धारकांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली. याविरोधात शिवसेनेचे शहर प्रमुख सुर्यकांत इलमे यांच्या नेतृत्वात ९ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत फुटपाथ धारकांना व्यापारी गाळे उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले. १० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत गाळे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने उपोषण मागे घेतले.जिल्हा प्रशासनाने २७ डिसेंबरपासून शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतल्यानंतर सर्वच फुटपाथ दुकाने हटविण्यात आले. अतिक्रमण काढण्यास विरोध नाही. परंतु फुटपाथ दुकानदारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. फुटपाथ दुकानदारांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा ९ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख सूर्यकांत इलमे यांनी दिला होता. फुटपाथ विक्रेत्यांनी केंद्र सरकारच्या विधेयकाची अंमलबजावणी करण्यात यावी, फुटपाथ विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख सूर्यकांत इलमे यांच्या नेतृत्वात फुटपाथ धारकांनी ९ जोनवारीपासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी फुटपाथ धारकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश न.प. मुख्याधिकारी अढागळे यांना दिले. मुख्याधिकाऱ्यांनी फुटपाथधारकांच्या दुकान गाळ्यांसाठी भुखंडाचा शोध घेण्याचे आदेश निर्देश अधिनस्त अधिकाऱ्यांना दिले आहेत. तथापि, मुख्याधिकारी अढागळे यांनी १० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता सूर्यकांत इलमे व उपोषणकर्त्यांची भेट घेवून फुटपाथ धारकांसाठी लवकरात लवकर दुकान गाळे उपलब्ध करून देण्याची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चे अंती उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आणखी उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष सुर्यकांत इलमे, मुख्याधिकारी अढागळे, वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गोकूळ राऊत, पुरूषोत्तम खापेकर, गणेश धकाते, गणेश बारापात्रे, महेंद्रसिंग गहेरवार, देवदास करवाडे, मुकेश थोटे, जयंत बोटकुले, प्रेमदास धारगावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)