साकोली : येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ए. एन. पटले यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य के. एस. डोये होते. प्रमुख पाहुणे डी. जी. डोंगरवार, आर. बी. कापगते, एम. व्ही. कापगते आदी मान्यवर मंचावर हजर होते. यावेळी सेवानिवृत्त सत्कारमूर्ती शिक्षक ए. एन पटले व पत्नी आश्विनी पटले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ए. एन. पटले यांनी २३ वर्षे शिक्षण सेवा दिली. असे सांगितले व त्यांच्या शाळेच्या जीवनातील आठवणींना धनंजय तुमसरे यांनी प्रास्ताविकात उजाळा दिला. कार्यक्रमात एम. व्ही. कापगते, एम. टी. कोचे, के. एम. कापगते, के. जी. लोथे, प्राचार्य के. एस. डोये यांनीही मनोगत व्यक्त केले. आर. व्ही. दिघोरे यांनी सूत्रसंचालन केले. आर. बी. कापगते यांनी आभार मानले.
पटले यांचा सेवानिवृत्ती सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:41 IST