लाखांदूर : ३० खाटांची सुविधा असलेला लाखांदूर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गरीब रुग्णांना आरोग्याच्या सेवा पुरविण्यास असमर्थ ठरला आहे. शासनाने उपलब्ध करून घेतलेल्या सेवा मिळत नसल्याने वैतागलेला रुग्ण खुद्द रेफर टू भंडारा म्हणत अखेरच्या श्वासाची प्रतिक्षा करतो.पावसाळ्याचे दिवस, साथीच्या आजाराचा संपूर्ण तालुक्यात उद्रेक, डेंग्यूचे थैमान असताना दररोज ग्रामीण रुग्णालय हाऊस फुल्ल असतो. ३० खाटांची सुविधा असताना काही रुग्णांना जमिनीवर रात्र काढण्याची वेळ येते. स्वच्छतेचा अभाव. दोन वर्षापासून जनरेटर बंद, एक्स रे मशीन बंद, कुलर बंद, नादुरूस्त साहित्य, मशिन्स आहेत. रात्री पाळीला दोन दिवसाचे बाळ उकाढ्यात रात्र काढत असताना येथील कर्मचारी कुलरच्या हवेत झोप घेतात. लोडशेडींगच्या वेळात स्वत: इर्न्व्हटर वापरतात. रुग्णांना रुग्णालयाबाहेर रात्र काढावी लागते. यासंबंधी येथील प्रशानाला विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात.निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून दि.१९ आॅगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत रुग्णवाहिका बंद पाढून ठेवत येथील वैद्यकीय उपअधिक्षकाने जुळ्या मुलांच्या बाळंतपणात हयगय केल्याने रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मृत्यू ओढवला होता. यावेळी गरीब कुटूंबांना खाजगी वाहनाचा वापर केल्याने आर्थिक खर्च सहन करावा लागला. या कालावधीत शेकडो रुग्णांना रुग्णवाहिका बंद असल्याने आर्थिक फटका बसला. रात्री सुखाची झोप लागावी व रुग्णांची सेवा रात्रीच्या पाळीची सेवा देण्यास तयारी नसलेल्या डॉक्टरांनी शक्क्ल लढवून रेफर टू भंडारा सांगण्यात येते. भंडारा येथे सुखरूप बाळंतपण झाल्याची प्रकरणे आहेत.आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असून यापूर्वी मुदत बाह्य औषधांचे वाटप याच ग्रामीण रुग्णालयातून करण्यात आले होते. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे बेहाल
By admin | Updated: September 17, 2014 23:35 IST