शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली असून, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यावर पोहोचले आहे. ...

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली असून, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यावर पोहोचले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही कमी येत असून, पाॅझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के आहे. शनिवारी जिल्ह्यात केवळ ६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

भंडारा जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ८६९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ५९ हजार ३५४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. दररोज सरासरी १,२००च्या आसपास पाॅझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूचे तांडव सुरू होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. यामुळे समाजमन भयभीत झाले होते. अशा स्थितीत मे महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात यायला लागली. जून महिन्यात तर मोठा दिलासा मिळाला. कोरोना रुग्णांची संख्या सिंगल डिजिटमध्ये यायला लागली, तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.२१ टक्के आहे. मृत्युदर १.७८ टक्के आणि पाॅझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत असल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

५८ हजार १७३ व्यक्ती कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार १७३ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात २४ हजार १७९, मोहाडी ४,२५३, तुमसर ६,९९२, पवनी ५,९००, लाखनी ६,४३२, साकोली ७,५५० आणि लाखांदूर तालुक्यात २,८६७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा ३६, मोहाडी १३, तुमसर ८, पवनी ९, लाखनी १८, साकोली ३१, लाखांदूर ११ रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४ हजाराच्या आसपास गेली होती. त्यावेळी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. मात्र, आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे.

२० दिवसांत एक मृत्यू

एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यूचे तांडव अनुभवणाऱ्या जिल्ह्याला जून महिन्यात मोठा दिलासा मिळाला. ४ जून रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला. गत २० दिवसांत केवळ एकाच मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १,०५५ व्यक्ती मृत्युमुखी पडले. त्यात भंडारा ४९२, मोहाडी ९५, तुमसर ११९, पवनी १०४, लाखनी ९५, साकोली १०१, लाखांदूर ४९ रुग्णांचा समावेश आहे.