लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसोबत धावपळ करणारे त्यांचे नातेवाईक तणावामुळे व इतर साधनांपासून अपेक्षित असे भोजन न मिळाल्याने सर्वत्र भटकतात. काही तर गरीब असल्याने ते पोटभर जेवणसुद्धा करीत नाही. या गंभीर समस्येकडे बघून व स्वच्छतेच्या मुद्याला लक्षात घेऊन राजमाता जिजाऊ फाउंडेशन मार्फत केवळ दहा रुपयात पोटभर जेवण, असा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी अधिकारी डॉ.सुनीता बढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे, सूरज परदेशी, प्रा.बबन मेश्राम, पराग महाकाळकर, नरेश आंबिलकर, बंडू मलोडे, भानु बनकर, विष्णू लोणारे, दीपक वाघमारे, अनिकेत मलोडे, क्रिष्णा उपरीकर, विशाल सांडेकर व विनोद भुते उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.सुनीता बढे यांनी उपक्रमाची गरज होती. हा उपक्रम राबविण्यात सर्व यशस्वी होतील, असे प्रतिपादन केले. सूर्यकांत इलमे यांनी कमीत कमी रुपयात सर्व गरजू लोकांना पोटभर जेवणे कसे प्रदान करावे याचे महत्व थोडक्यात पटवून दिले.संचालन सूरज परदेशी व आभार विशाल सांडेकर यांनी मानले. या उपक्रमात पवन मेश्राम, महेश भोजवानी, संजीव मेश्राम, मनोज निंबार्ते, लाला शर्मा, राकेश आंबोने, राहुल नागदेवे, जयंता बोटकुले, जुबेत खान, हरिश मोगरे, योगाशिव मलोडे, एकनाथ फेंडर, प्रशांत निखारे, प्रतीक तावडे, दारा आनंद, किशोर इंगोले, हर्षल वांदिले, उमेश मोहतुरे, नितीन नागदेवे, जालेंद्र तांडेकर व बबन बुधे या सहकार्याची भूमिका पार पाडली.भोजन दररोज सकाळी ११ ते १ व सायंकाळी ७ ते ८ या वेळेत एम.एस. बिर्यानी सेंटर, जिल्हा रुग्णालयासमोर उपलब्ध राहील. उपक्रम सुरु होऊन दोन दिवसात ३५० पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला.
रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची समस्या झाली दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:40 IST
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसोबत धावपळ करणारे त्यांचे नातेवाईक तणावामुळे व इतर साधनांपासून अपेक्षित असे ...
रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची समस्या झाली दूर
ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालय : राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचा नावीन्यपूर्ण उपक्रम