शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ८६९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ५९ हजार ३५४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. दररोज सरासरी १,२००च्या आसपास पाॅझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूचे तांडव सुरू होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. यामुळे समाजमन भयभीत झाले होते.

ठळक मुद्देपाॅझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के : शनिवारी ६ पाॅझिटिव्ह, ७ कोरोनामुक्त

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली असून, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यावर पोहोचले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही कमी येत असून, पाॅझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के आहे. शनिवारी जिल्ह्यात केवळ ६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.भंडारा जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ८६९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ५९ हजार ३५४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. दररोज सरासरी १,२००च्या आसपास पाॅझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूचे तांडव सुरू होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. यामुळे समाजमन भयभीत झाले होते. अशा स्थितीत मे महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात यायला लागली. जून महिन्यात तर मोठा दिलासा मिळाला. कोरोना रुग्णांची संख्या सिंगल डिजिटमध्ये यायला लागली, तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.२१ टक्के आहे. मृत्युदर १.७८ टक्के आणि पाॅझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत असल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. 

५८ हजार १७३ व्यक्ती कोरोनामुक्त- जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार १७३ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात २४ हजार १७९, मोहाडी ४,२५३, तुमसर ६,९९२, पवनी ५,९००, लाखनी ६,४३२, साकोली ७,५५० आणि लाखांदूर तालुक्यात २,८६७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १२६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा ३६, मोहाडी १३, तुमसर ८, पवनी ९, लाखनी १८, साकोली ३१, लाखांदूर ११ रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४ हजाराच्या आसपास गेली होती. त्यावेळी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. मात्र, आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे.

२० दिवसांत एक मृत्यू- एप्रिल महिन्यात कोरोना मृत्यूचे तांडव अनुभवणाऱ्या जिल्ह्याला जून महिन्यात मोठा दिलासा मिळाला. ४ जून रोजी एका रुग्णाचा मृत्यू झाला. गत २० दिवसांत केवळ एकाच मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १,०५५ व्यक्ती मृत्युमुखी पडले. त्यात भंडारा ४९२, मोहाडी ९५, तुमसर ११९, पवनी १०४, लाखनी ९५, साकोली १०१, लाखांदूर ४९ रुग्णांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या