शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. दररोज मृत्यूचा आकडाही वाढत होता. या सर्व प्रकाराने नागरिक भयभीत झाले होते. मात्र, जून महिना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. जून महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत येऊ लागली. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले.

ठळक मुद्देपाॅझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के : शनिवारी ९० कोरोनामुक्त, १७ पाॅझिटिव्ह

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के तर पाॅझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के होता. प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र, अनलाॅक प्रक्रियेने सूट मिळाल्याने नागरिकांची बाजारात होणारी गर्दी धोकादायक ठरू शकते.कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. दररोज मृत्यूचा आकडाही वाढत होता. या सर्व प्रकाराने नागरिक भयभीत झाले होते. मात्र, जून महिना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. जून महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत येऊ लागली. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले. दररोज ७० ते ८० व्यक्ती कोरोनामुक्त होत आहेत. शनिवारी जिल्ह्यात ९७० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा २, तुमसर ३, पवनी १, लाखनी ६, साकोली २ आणि लाखांदूर तालुक्यात ३ असे १७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार २३७ व्यक्ती पाॅझिटिव्ह झाले होते. त्यापैकी ५७ हजार ८९० व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. गत दहा दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात आता कोरोना बळींची संख्या १०५८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८९० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात भंडारा तालुका २४ हजार १२७, मोहाडी ४२३६, तुमसर ६९७४, पवनी ५८८५, लाखनी ६४१२, साकोली ७४०५ आणि लाखांदूर तालुक्यात २८५१ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गत आठवड्यात अनलाॅक प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील बाजारपेठ सुरु झाली आहे. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु असते. परंतु बाजारपेठेतील गर्दी बघितल्यानंतर कोरोना संपला की काय अशी शंका येते. कोरोना संसर्गाचे नियम पायदळी तुडवत प्रत्येक दुकानात मोठी गर्दी होत आहे. नगरपरिषदेचे पथक सूचना देऊनही कुणी ऐकत नाही.

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२८ - जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. गावागावात रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. गत आठवड्यात हजाराच्या आसपास असलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३२८ वर आली आहे. भंडारा तालुक्यात ६४, मोहाडी २०, तुमसर २३, पवनी २०, लाखनी २८, साकोली १५०, लाखांदूर २३ असे ३२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाने बळी नाही- एप्रिल महिन्यात मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्यात जून महिन्यात मोठा दिलासा मिळत आहे. गत १२ दिवसात केवळ एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. गत आठवडाभरात तर एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १०५५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.७८ टक्के आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या