शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
4
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
5
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
6
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
7
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
8
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
10
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
11
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
12
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
13
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
14
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
15
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
16
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
17
Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
18
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
19
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
20
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

उपजिल्हा रुग्णालयात नाव नोंदणीसाठी रुग्णांच्या रांगा

By admin | Updated: June 5, 2014 23:49 IST

तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे बाह्यरुग्ण विभागात नेहमीच रुग्णांच्या रांगाच रांगा दिसतात. डॉक्टरांच्या संपकाळात

तुमसर :   तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे बाह्यरुग्ण विभागात नेहमीच रुग्णांच्या रांगाच रांगा दिसतात. डॉक्टरांच्या संपकाळात येथे केवळ आठ कंत्राटी डॉक्टरांची सेवा सुरू होती. येथे सध्या १४ पदे रिक्त आहेत. त्यात एक डॉक्टर व वैद्यकीय अधिक्षक पदाचा समावेश आहे.तुमसर शहर व तालुक्यातील सुमारे तीन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय होते. मध्यप्रदेशातूनही येथे नागरिक रुग्ण मोठय़ा प्रमाणात येतात. १00 खाटांचा हा दवाखाना स्वत: आजारी असल्याचे येथे दिसते. डॉक्टरांच्या संपकाळात (३१ मे) या दवाखान्यात आठ कंत्राटी डॉक्टरांनी जिकरीची सेवा रुग्णांना दिली. यात सहा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आयुषचे वैद्यकीय अधिकारी व आयुष वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश होता. यात तीन पुरूष व तीन महिला डॉक्टर्स होत्या तर दोन आयुष वैद्यकीय अधिकारी होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात स्वत: रुग्णाला नाव नोंदणीकरीता रांगेत उभे राहावे लागते. नाव नोंदणी करणारे कर्मचारी येथे नेहमी एकच दिसतो. निदान ते तीन असायला पाहिजे स्वत: आजारी व्यक्ती रांगेत किती वेळ उभा राहू शकेल निदान याचा विचार रुग्णालय प्रशासनाने करावयास पाहिजे. येथे मंजूर पदे ९४ आहेत. सध्या ८0 कर्मचारी कार्यरत असून १४ पदे रिक्त आहेत. त्यात एका डॉक्टरचे पद रिक्त आहे. येथील वैद्यकीय अधिक्षक प्रभारी असून दोन वर्षापासून कायम वैद्यकीय अधिक्षक पद भरण्यात आले नाही. परिचारकांचे सहा पद रिक्त आहेत. वर्ग ३ चे ७ तथा वर्ग चार चे चार पदे येथे रिक्त आहेत. येथे डॉक्टरांची संख्या १२ आहे. यात पुरूष डॉक्टर्स १0 तर महिला डॉक्टर्स दोन आहेत. परिचारीकेंची एकूण संख्या २१ तर कार्यालयीन कर्मचारी संख्या ४0 आहे. आठ वर्षापुर्वी या रुग्णालयाने राज्यस्तरीय आनंदीबाई जोशी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला होता हे विशेष. आरोग्य विभागाने येथे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)