शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बुद्धाचा शांतीचा मार्गच विश्वाला नवी दिशा देईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:26 IST

विश्वात सगळीकडे दहशतवाद पसरला आहे. अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वात शांती निर्माण करण्याकरिता भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देभदंत खोशोतानी : महासमाधीभूमी महाविहाराचा ११ वा वर्धापन दिन

ऑनलाईन लोकमतपवनी : विश्वात सगळीकडे दहशतवाद पसरला आहे. अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वात शांती निर्माण करण्याकरिता भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्याची गरज आहे. बुद्धाचा शांतीचा मार्गच विश्वाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघ जपानचे अध्यक्ष खोशोतानी यांनी केले.महासमाधीभूमी महाविहाराचा ११ वा, पञ्ञा मेत्ता बालसदनाचा २३ वा, वाचनालयाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त महासमाधीभूमी महास्तुप रूयाळ (सिंदपुरी) येथे आयोजित ३१ व्या धम्म महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी धम्मपीठावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष धम्मदूत भदंत संघरत्न मानके होते.याप्रसंगी अ.भा. भिक्कू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथवीर, तेंदाई संघ इचिगुवो तेरासू, जापानचे अध्यक्ष भदंत शोताई योकोयामा, म्यामनारचे भदंत डॉ. सयाडो उत्तमा, तिबेट गोठनगावचे भदंत लोबझान तेंबा, पञ्ञा मेत्ता संघ जपानचे कार्याध्यक्ष भदंत शोझे आराही, जपानचे भदंत खोदो कोंदो, योशितेरू सामेजीया, होजिरी विहार सारनाथच्या भिक्खुनी म्योजिच्छू नागाकुची, पश्चिम बंगालचे भदंत शुभरत्न, बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहारचे अध्यक्ष सत्यशील, बौद्ध चैतीय प्रकल्प राजेगावचे अध्यक्ष भदंत धम्मदीप, विदर्भ भिक्कु संघाचे अध्यक्ष भदंत प्रियदर्शी, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रचारक भदंत नागदीपांकर, प्रज्ञागिरी डोंगरगडचे भदंत धम्मतप, भदंत धम्मशिखर, नागपूरचे भदंत महापंत, भदंत मेत्तानंद, भदंत शिलवंश, भदंत संघकिर्ती, अरूणाचल प्रदेशचे भदंत वन्नास्वामी, सिंदपुरीच्या सरपंच भाग्यश्री येलगुले, रूयाडच्या सरपंच माधुरी पचारे उपस्थित होते.यावेळी संघरत्न मानके म्हणाले, या महास्तुपाची ही वास्तू भारतात सर्वात मोठी असून हा महास्तुप भारत जपानच्या मैत्रीचे प्रतीक ठरला आहे. या स्तुपामुळे पर्यटनाला चालना मिळून विकासाचे नवीन दारे उघडणार आहेत. संघाच्या कार्यामुळे सुरूवातीच्या काळापासून जनतेचा सामाजिक, धार्मिक, आर्थिक विकास कसा करावा यावर काम सुरू आहे.मुख्य समारंभात भदंत शोताई योकोयामा म्हणाले, भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचे अनुसरन करण्याची गरज आहे. भदंत सदानंद महास्थवीर म्हणाले, माझे जन्मस्थळ पवनी तालुक्यात असल्यामुळे मला आपुलकी आहे. पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य समाजाला पथदर्शक ठरेल.याप्रसंगी पञ्ञा पिठक पुरस्कार भिख्कुनी संघमित्रा व भदंत सत्यशील यांना व मेत्तापिठक पुरस्कार उमेश राठोड व उपासक डी.एम. बेलेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम, संचालन अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी तर आभारप्रदर्शन अ‍ॅड. गौतम उके यांनी केले. कार्यक्रमासाठी मनोहर मेश्राम ब्रम्ही, शिलरत्न कवाडे, अ‍ॅड. जयराज नाईक, भदंत धम्मतप, जयसर, करुणा टेंभुर्णे, गजेंद्र गजभिये, अ‍ॅड. गौतम उके, प्रफुल्ल वाघमारे, श्रीकांत शहारे व समता सैनिक दलाने सहकार्य केले.