शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

शासकीय कार्यालयांचे पासवर्ड असुरक्षित व्यक्तींच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शासनाच्या सर्व सुविधा आता ऑनलाईन झाल्या असून प्रत्येक शासकीय कार्यालय ऑनलाईन झाले आहे. याठिकाणी ...

ठळक मुद्देअनेक ठिकाणी खासगी व्यक्तींची नेमणूक । तलाठी कार्यालयांसह विविध ठिकाणी वापर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या सर्व सुविधा आता ऑनलाईन झाल्या असून प्रत्येक शासकीय कार्यालय ऑनलाईन झाले आहे. याठिकाणी ऑनलाईन कामासाठी गोपनीय पासवर्ड देण्यात आले आहे. मात्र अनेक कार्यालयात ही प्रणाली खासगी व्यक्ती हाताळत असून गोपनीय पासवर्ड असुरक्षित हाती गेल्याचे दिसून येत आहे.तलाठी साझासह विविध कामे जलद गतीने व्हावे, जनतेला कागदपत्र वेळेत मिळावे यासाठी संगणकीकृत ऑनलाईन प्रणाली अस्तित्वात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे विविध दाखले मिळणे सोईचे झाले आहे. परंतु अनेक ठिकाणी आता ही आॅनलाईनची कामे करण्यासाठी खासगी व्यक्तींची सेवा घेतली जात असल्याचे दिसून येते. अनेक कर्मचारी ऑनलाईन प्रणाली हाताळण्यास घाबरताना दिसतात. त्यामुळे त्यांनी आपल्या सोयीसाठी नियमबाह्य खासगी व्यक्तींची नेमणूक केली आहे. आपली कामे करण्यासाठी त्या व्यक्तींना गोपनीय पासवर्ड देण्यात आला आहे. सदर कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील ही मंडळी असली तरी या पासवर्डचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा ऑनलाईन प्रणाली हाताळताना चुकीच्या नोंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. तलाठी साझ्यासह अनेक कार्यालयात कर्मचाऱ्याआड खासगी व्यक्ती आॅनलाईन प्रणाली हाताळत असल्याने गोपनीयतेचा भंग होत असल्याचे दिसत आहे.तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासनाने सर्व कामे ऑनलाईन करण्याचे सक्तीचे केले आहे. त्यांना सॉफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. त्यासाठी गोपनीय पासवर्ड देण्यात आले. सात बारा अद्यावत करणे, फेरफार नोंदविणे, वारसा फेरफार करणे, क्षेत्र दुरूस्ती करणे अशी कामे तलाठ्यांकडून केली जातात. परंतु काही तलाठी साझ्यामध्ये गेल्यास तेथे खासगी व्यक्ती ऑनलाईन प्रणालीवर काम करताना दिसून येते. वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे.