शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी अनुभवला थरार

By admin | Updated: June 20, 2015 01:08 IST

प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी अचानक दमदार पावसाने हजेरी लावताच बस चालकाने दर्शनी भागावरील वायफर सुरु केले मात्र ते वायफर बंद स्थितीत असल्याने .....

तुमसर : प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी अचानक दमदार पावसाने हजेरी लावताच बस चालकाने दर्शनी भागावरील वायफर सुरु केले मात्र ते वायफर बंद स्थितीत असल्याने जीव मुठीत घेऊन बस चालविताना थरार बसमधील प्रवाशांनी अनुभवला. ही घटना १८ जूनला रात्री नागपूरवरुन तुमसरकडे येत असतांना घडली.सुरक्षित प्रवास एस.टी. चा प्रवास असे एस.टी. चे ब्रिद वाक्य असल्याने नागरिकांनीही एस. टी. त प्रवास करण्यास पहिली पसंती दिली परिणामी अव्वाचा सव्वा भाडे वाढ होवूनही नागरिक आजही एस. टी. च्या बसमध्ये प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणे मोठे आहे. मात्र भरमसाठ पैसे कमविण्याच्या नादात बस गाड्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत असून भंगारात जमा होणाऱ्या तसेच कालबाह्य बस गाड्या रस्त्यावरुन धावतांनी दिसत असून कितीतरी तुमसर अगारातील बसगाड्यांचे अपघाताचे किस्से लिहिल्या गेले पंरतु तुमसर आगाराला अजुनही जाग न आल्याचे चित्र १८ जूनला रात्री घडलेल्या घटनेवरुन दिसते.१८ जूनला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तुमसर आगाराची नागपुर- तुमसर बस एम ४० - ९४०४ जलद बस नागपुर स्थानकावर ३० ते ४० प्रवासी घेऊन निघाली असता मौदानजीक पावसाने हजेरी लावली असता. तुमसर आगरातील बस गाड्याचे सर्व पितळ उघडे पडले. वायफर बंद स्थितीत असतांना रस्त्यावर काहीही दिसत नसतांना मात्र बस चालकाने जीव मुठीत घेवून हळूवार बस गाडी हाकत तुमसर बस स्थानकापर्यंत आणत असतांना बस मध्यल्या २० ते २५ प्रवाशांनी हा थरार अनुभवला. (शहर प्रतिनिधी)