शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:31 IST

पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

ठळक मुद्देमहादेव जानकर : लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियान

आॅनलाईन लोकमतदेवरी : पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानांतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (दि.२४) घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच विद्या खोटेले होत्या. या वेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. संजय गायगवळी, जि.प. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शहारे, जि.प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी हिरूळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जानकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत अनेक योजना आहेत. त्या योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांनी लाभ घ्यावा. गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकºयाने जोडधंदा म्हणून माशांची शेती करावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन व्यवसाय करावा. शेतकºयाचा मुलगा उद्योगपती कसा बनेल, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही. पशुसंवर्धन विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर कशा पध्दतीने भरता येतील, यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लाळ खुरकूत हा गाई-म्हशींमध्ये विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. लसीकरणामुळे पशुधनाचा लाळ खुरकूत या सांसर्गिक रोगापासून बचाव होतो. त्यामुळे उत्पादनाचे सातत्य टिकून राहते व रोगमुक्त पशुजन्य उत्पादनांची निर्यात सुलभ होते. सर्व शेतकºयांनी एफएमडीसीपी अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. शहारे म्हणाले, जिल्ह्यातील संकलित दुधाकरिता मार्केटिंगची आवश्यकता आहे. या लसीकरण अभियानाचा सर्व गोपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून डॉ. वासनिक म्हणाले, जनावरांचे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी उशीरा म्हणजेच थंड वातावरणात करावे, असे सांगितले.