शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा

By admin | Updated: September 22, 2015 00:51 IST

जीवन जगत असतांना प्रत्येकाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी सोयीनुसार नागरिक बँका, पतसंस्था

साकोली : जीवन जगत असतांना प्रत्येकाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी सोयीनुसार नागरिक बँका, पतसंस्था किंवा इतर ठिकाणाहून कर्ज घेतात. कर्ज घेऊन आर्थिक अडचण सोडवितात. मात्र परतफेड करतांनी बरेच कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास धजावत नाही. घेतलेले कर्ज हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे कर्ज बुडविणे म्हणजे राष्ट्राचे नुकसान करणे होय. निधीची परतफेड करून देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा, असे प्रतिपादन प्राचार्य होमराज कापगते यांनी केले. शनिवारी श्री साई ग्रामीण बिगर सहकारी संस्थेच्या सभेप्रसंगी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर बावनकुळे, कार्यवाह रेवाराम तिडके, संचालक दामोदर कापगते, धनंजय डोंगरवार, घनश्याम वलथरे, रेवाराम डोंगरवार, भास्कर भेंडारकर, नानेश्वर लोहीकर, शैलेश गजभिये, यादोराव राऊत, सुनीता वाडीभस्मे उपस्थित होते.यावेळी राहुल काशीवार, वल्लभ बोरकर, मनिष झोडे, अंशुमन कटकवार, दामिनी बन्सोड, तेजस्वीनी डोंगरवार, नितीन काशीवार, जोगीराज गोटेफोडे, नलीनी संग्रामे, स्वाती कावळे, ऐश्वर्या बावने, खुशबू भेंडारकर, तोषित घोरमारे, अंकुराज गणवीर, पुनम देवगीरीकर, तिलकचंद धोटे, यश फुंडे, अक्षय श्रीरांजे, आदित्य बोरकर या गुणवत विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. जेष्ठ सभासद म्हणून छगन कापगते साकोली, हरिभाऊ घरडे बेदरा, डॉ. महादेव कापगते सेंदुरवाफा व अर्जुन कोसरे सेंदुरवाफा यांचाही शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन शैलेश गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शिवशंकर बावनकुळे यांनी केले. कार्यक्रमाकरिता व्यवस्थापक भागवत मेश्राम, वरिष्ठ लिपीक शरद ब्राम्हणकर, कनिष्ठ लिपीक विनोद ठाकुर, घनश्याम राऊत, मनोज तिरपुडे यांनी सहकार्य केले. आमसभेला सर्व सभासद उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)