शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

पालकांनी शिक्षणात गुंतवणूक करावी

By admin | Updated: August 18, 2016 00:21 IST

स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्याकरिता दर्जेदार शिक्षणाची गरज आहे.

८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन तुमसर : स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्याकरिता दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. प्रत्येक पालकांनी काटकसर करून शिक्षणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. संताजी सभागृहात आयोजित तेली समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आमदार चरण वाघमारे, तेली समाजाचे केंद्रीय कार्याध्यक्ष कमलाकर घाटोळे, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी नगराध्यक्ष अरविंंद कारेमोरे, डॉ. पवन तिबुडे, विक्रीकर अधिकारी भारती पाटील, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, डॉ. पंकज कारेमोरे, प्रदीप पडोळे, सुधाकर कारेमोरे, कल्याणी भुरे, कुंदा वैद्य, सीमा भुरे, कविता साखरवाडे, राजेश देशमुख, अ‍ॅड. दिलीप तिमांडे उपस्थित होते. ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह तथा संताजीच्या विचारांचे पुस्तक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिथींनी मार्गदर्शन केले. संतोष खोब्रागडे, नामदेव हटवार यांनी कॅरीअरबद्दल माहिती दिली. संचालन व प्रास्ताविक युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष अनिल कारेमोरे तर आभार शैलेश पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक अरुण मोखारे, अजय हटवारसह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनिल साठवणे, विजय लांजेवार, अमित कुंजेकर, गणेश पाहुणे, पवन पाटील, किशोर हटवार, जवाहर कुंभलकर, प्रमोद चिंधालोरे, निलेश कापसे, जितेंद्र बावनकर, सुनिल थोटे, मनिष धुर्वे, नरेश भुरे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)