शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश खरेदीसाठी होणार पालकांची धावपळ

By admin | Updated: June 20, 2017 00:20 IST

बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात.

मिळणार फक्त २०० रुपये : गणवेश निधी होणार बँक खात्यात जमालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मोफत गणवेश योजनेअंतर्गत येणाऱ्या २०० रुपयात ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कापड विकत घेणे कठीण आहे. २०० रुपये कापडावरच खर्च झाल्यानंतर शिलाईचे काय? असा प्रश्न आता पालकांसमोर उपस्थित होत आहे. पूर्वी शाळास्तरावरुन एकत्रितरीत्या कापड अथवा रेडीमेड ड्रेस खरेदी करण्यात येत होते. त्यामुळे २०० रुपयात गणवेश तयार होत होते. परंतु चालू शैक्षणिक वर्षापासून गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे २०० रुपयांमध्ये गणवेशाचे कापड खरेदी करुन ते शिवण्याची कसरत पालकांना करावी लागणार आहे. दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढत आहे, असे असतानाही दुसरीकडे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत एका गणवेशाखाली २०० रुपये देऊन विद्यार्थ्यांची बोळवण केली जात आहे. मागील काही वर्षांपासून गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली नाही. परंतु गणवेशाचे पैसे शाळा स्तरावर देण्यात येत होते. या रक्कमेतून शाळा स्तरावरच एकत्रितरित्या गणवेश खरेदी करण्यात येत होते. अनेकवेळा सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यानंतर पैसे कमी पडत होते. अशावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी आर्थिक हातभार लावायचे. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थी नविन गणवेशात शाळेत येत होते. परंतू चालू शैक्षणिक वर्षापासून योजनेंतर्गत प्रत्येकी दोन गणवेशासाठी दिले जाणारे २०० रुपये हे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आता गणवेश खरेदीची जबाबदारी थेट पालकांच्या खांद्यावर आली आहे. एकीकडे एखादा रुमाल घ्यायचा असला तरी २५ ते ५० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे शासनाने २०० रुपयांमध्ये गणवेश खरेदी करण्याचा नवोपक्रम राबविला आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी ते खिशातून रक्कम टाकून गणवेश खरेदी करु शकतात. मात्र गावनिवाह विचार केल्यास अशा पालकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यांचे हातावर आणून पाणावर खाणे आहे, असे पालक जास्तीचे पैसे कुठून आणणार अशा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने सध्याच्या बाजारपेठेतील दराचा विचार करुन गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळेतूनच गणवेश वाटप करावेसर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच मोफत पाठपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्याच धर्तीवर गणवेश वाटप करावे अशी मागणी पालकांकडून होत आहे. एकत्रितरित्या खरेदी केल्याशिवाय २०० रुपयांच्या बजेटमध्ये गणवेश बसत नाही. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम न टाकता खादी महामंडळाकडून गणवेशाचा कापड खरेदी करावा अशी मागणी होत आहे. हे जरी शक्य नसल्यास शाळेतूनच गणवेश वाटप करावे, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेने वाटा उचलावामोफत गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पालकांना पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणवेश केवळ २०० रुपयात खरेदी करावा लागणार आहे. महागाई लक्षात घेता. २०० रुपयात गणवेश मिळणे कठीण आहे व बँकेत पैशाच्या टंचाईने पालकांना २०० रुपयांसाठी मजूरी सोडून रांगेत उभे राहणे कठीण होईल. त्यामुळे कमी पडणाऱ्या रक्कमेचा वाटा जिल्हा परिषदेने उचलावा अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.