शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो, जागरूक व्हा, बालकांना मोबाइलपासून दूर ठेवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 11:12 IST

बालरोगतज्ज्ञांचा सल्ला: आरोग्यावर होताहेत विपरीत परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आधुनिक युगात संगणक व मोबाइलचा वापर वाढीस लागला आहे. स्क्रीन टाइम वाढल्याने डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहेत. त्यातच अनेकजण बालकांच्या हातात मोबाइल देतात; परंतु असे करणे बालकांसाठी अहितकारक असल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. पालकांनी, जागरूकता दाखवीत बालकांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

बालकाची ५ ते ६ वर्षे ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत मोलाची असतात. शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या हे वय त्याचे भविष्यातील व्यक्तिमत्त्व घडविणारे असते. मात्र, ही स्थिती सध्या दुरापास्त होत आहे. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टेंब व इतर तांत्रिक उपकरणांनी त्यांना इतके आकृष्ट केले की, इतर आवश्यक नैतिक संस्कार मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे येणारी पिढी आरोग्यदृष्ट्या सुदृढ व मानसिकदृष्ट्या संस्कारित होईल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. आधुनिक काळातील औषधे ही तात्पुरती ठीक असतात; परंतु त्या औषधाने प्रतिकारशक्ती वाढत नाहीत. यासाठी कुटुंबांनी जाणीवपूर्वक योग्य वेळ खर्च करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यातच बालकांना मोबाइलपासून दूर ठेवण्याची आवश्यक आहे. 

त्रास टाळण्यासाठी मोबाइल देणे चुकीचे लहान मुलं घरामध्ये सातत्याने आई-वडिलांना खेळण्यासाठी किंवा अन्य कोणत्या ना कोणत्या कारणासाठी त्रास देतात. त्यामुळे या त्रासातून सुटका व्हावी म्हणून अनेकजण बालकांच्या हाती मोबाइल थोपवून मोकळे होतात. पालकांनो, असे करणे अत्यंत चुकीचे व जोखमीचे आहे.

"बालकांना निरोगी ठेवण्यासाठी पालकांनी वैद्यकीय सल्ल्याने नैसर्गिक घटकयुक्त पदार्थ देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लहान वयात मोबाइल अजिबात मुलांच्या हाती देऊ नये. मोबाइलचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. मोबाइलचा अतिवापर मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या पंगू बनवू शकतो. तांत्रिक उपकरणांपासून मुलांना दूर ठेवावे. त्याऐवजी मुलांना मैदानात खेळण्यासाठी, धावण्यासाठी पुरेसी मोकळीकता देणे हिताचे ठरते. शारीरिक आरोग्य ठणठणीत असावे." - डॉ. शशांक क्षीरसागर, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.

"लहान मुलांच्या खानपानावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. रासायनिकतेच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस खालावला आहे. पिकांवर फवारणीचा अतिवापर होत असल्याने अन्नधान्यावर विपरीत परिणाम होतो. नैसर्गिक घटकयुक्त आहार मिळेनासा झाला आहे. पालकांनी जैविक, नैसर्गिक अन्नपदार्थ व भाजीपाल्याचा वापर करून बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सकस आहार देण्याचा प्रयत्न व्हावा. यामुळे मुले शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होत असतात." - डॉ. देवेंद्र फुले, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा